शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित शाळांनी अतिरिक्त शिक्षक नाकारले

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद सुधारित आकृतिबंधामुळे अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांतील १७४ शिक्षकांना शहरातील नामांकित खासगी शिक्षण संस्थांनी सामावून घेण्यास चक्क नकार दिला आहे.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादसुधारित आकृतिबंधामुळे अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांतील १७४ शिक्षकांना शहरातील नामांकित खासगी शिक्षण संस्थांनी सामावून घेण्यास चक्क नकार दिला आहे. त्यामुळे या संस्थांकडील संबंधित विषयांची रिक्त पदे कायमची व्यपगत (रद्द) का करण्यात येऊ नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली आहे. जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांतील १७४ शिक्षक व २२४ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने चालविला आहे. ५२ शिक्षकांचे समायोजन खासगी संस्थांतून करण्यात आले आहे. ७० शिक्षकांना औरंगाबाद महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेने शिक्षक देण्याची मागणी शिक्षण उपसंचालकांकडे केली होती. त्यानुसार उपसंचालकांमार्फतच महापालिकेला समायोजनाविषयी कळविण्यात आले आहे; परंतु ७० शिक्षकांचे समायोजन करण्यास पालिके नेही अद्याप होकार कळवलेला नाही. ६० शिक्षकांना जिल्हा परिषदेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांनी कळविला नकारश्रेयस बालक मंदिर, अलमीर उर्दू (प्रत्येकी शिक्षक ३), मॉन्टेसरी बालक मंदिर, सरस्वती भुवन प्राथमिक शाळा, झमझम उर्दू या शाळांतून प्रत्येकी एका शिक्षकाचे समायोजन करण्यात येणार होते; परंतु या शाळांनी सदर शिक्षकांना रुजू करून घेण्यास असमर्थता दर्शविली, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, या संस्थांकडे सदर जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय झाला होता; परंतु संस्थांनी नकार दिल्यामुळे त्यांच्याकडील रिक्त जागा कायमस्वरूपी व्यपगत का करण्यात येऊ नयेत, अशा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.