शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

'पुण्याचे नाव संभाजीनगर करा'; रिपब्लिकन सेना करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 20:10 IST

पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करुन त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे पुण्याची खूप मोठी बदनामी झाली आहे.

ठळक मुद्दे शिवसेनेने त्याकाळात हिंदू- मुस्लिम अशी दरी निर्माण करण्यासाठी हे राजकारण केले पुणे हेच संभाजीनगर या नावासाठी योग्य ठिकाण आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे नव्हे तर पुण्याचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करुन त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे पुण्याची खूप मोठी बदनामी झाली आहे. ती धुवून काढण्यासाठी पुण्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची गरज आहे. पुण्याचे नामकरण जिजापूर करा, अशी मागणी पुढे आली आहे, याकडे लक्ष वेधले असता आनंदराज म्हणाले, माॅं जिजाऊंबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांचे नाव शनिवारवाड्याला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. 

औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी १९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी सांगितले की, संभाजीनगर हे नाव औरंगाबादला देण्याचे कारण नाही. शिवसेनेने त्याकाळात हिंदू- मुस्लिम अशी दरी निर्माण करण्यासाठी हे राजकारण केले व त्याचा त्यांना फायदाही झाला. पुणे हेच संभाजीनगर या नावासाठी योग्य ठिकाण आहे. पुण्याचे नाव संभाजीनगर करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे लवकरच पुण्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले.

....हा तर आंबेडकर द्रोह एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर यांनी रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे भरकटलेले आहेत, अशी टीका केली. आर्थिक व सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणाऱ्यांबरोबर जाणे हा आंबेडकरद्रोह होय, असे सांगत भालचंद्र मुणगेकर हे पीईएसचे अध्यक्ष बनणे म्हणजे चौथा गट तयार करणे होय. पीईएसच्या अध्यक्षपदी बौद्ध व्यक्ती असणे सक्तीचे आहे. रामदास आठवले व भालचंद्र मुणगेकर हे हिंदू महार आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षच होता येत नाही, असा आक्षेप आनंदराज यांनी यावेळी घेतला. यावेळी संजीव बोधनकर, मिलिंद बनसोडे, आनंद कस्तुरे, सिध्दोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, सुनील मनोरे, पंचशीला जाधव, मनिषा साळुंके आदी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणे