शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दोस्ती का नाम जिंदगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:14 IST

व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.

रवींद्र अजमेरा ।लोकमत न्यूज नेटवर्कवासडी : व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.वासडी येथील जि. प. प्रशालेतील १९९४ मध्ये दहावी वर्गात सोबत असलेल्या वर्गमित्रांनी मागील दोन वर्षांपासून स्नेहमिलनाचा कार्यक्रम सुरू केला आहे.या वर्गातील ७० विद्यार्थी प्रत्येक वर्षी एकत्र येऊन प्रत्येकाचे सुख दु:ख विचारून सगळे मिळून मदतही करतात. यातूनच त्यांचा वर्गमित्र संजय वाघ हा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्या संसाराला ‘नजर’ लागली. घरात नवरा-बायकोत भांडणे होऊ लागली. यामुळे इतर मित्र चिंतित झाले. नंतर सर्व मित्रांनी आधार देऊन संजयची संसारवेल पुन्हा फुलविली.यावर्षी भगवान बाबा मंदिरावर हस्ता गावच्या विद्यार्थ्यांकडून या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला १९९४च्या बॅचचे सर्व विद्यार्थी व वासडी शाळेचे शिक्षक ए. व्ही. आरसूल, डी. पी. सुरडकर उपस्थित होते.वासडी येथील सरपंच राहुल पाटणी, मेहेगावचे सरपंच पांडुरंग घुगे, हस्ता गावचे माजी सरपंच मनोहर नीळ यांनी हजेरी लावून या उपक्रमाची प्रशंसा केली.अचानक काहीही संकट आले तर एकमेकांना मदत करायची, असा निर्णय या सर्व मित्रांनी घेतल्याने स्नेहमिलनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण झाले होते. यामुळे खुदगर्ज चित्रपटातील ‘दोस्ती का नाम जिंदगी...जिंदगी का नाम दोस्ती’ या गाण्याची आठवण मित्रांना झाली.माझ्या नवºयाने सोडलिया दारू...सर्व वर्गमित्रांनी स्नेहमिलनात संजयचा संसार सुखाचा करण्याचा संकल्प केला व तो ध्यासालाही नेला. संजयनेही मित्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दारू सोडली. यानंतर त्यास हॉटेलवर कामाला लावले. तो मागील एक वर्षापासून व्यसनाच्या दूर राहिला म्हणून यंदाच्या स्नेहमिलनात त्याचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करून हॉटेल व्यवसाय सुरू करून देण्याचा निर्धार करण्यात आला. १ जानेवारीला नववर्षदिनी हॉटेलही सुरु झाली. सर्व वर्गमित्रांनी संसार सुखाचा केल्याने संजयच्या वडिलांनी व पत्नीने सर्वांचे आभार मानले. आपल्या नवºयाने दारु सोडल्याचे कळताच बायकोलाही आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.