शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : लग्नकार्य, नामकरण विधीतही घोषणा दिल्या जायच्या ‘नामांतर झालेच पाहिजे’ : मंगल खिंवसरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:13 IST

लढा नामविस्ताराचा : नामांतर विरोधी म्हणायचे, घरात नाही पीठ.... मागतात विद्यापीठ’. मग त्याला नामांतरवाद्यांकडून उत्तर मिळायचे, ‘नसेल आमच्या घरात मीठ- पीठ, पण आम्हाला पाहिजे बाबांच्या नावाचे विद्यापीठ’. इतकेच नाही तर त्या काळात जिथे कुठे लग्नकार्य, नामकरण विधी, घरभरणी असेल तिथे आणि इतरही कार्यक्रमांमध्ये ‘नामांतर झालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जायच्या. १४ जानेवारी १९९४ रोजी प्रत्यक्षात नामविस्तार झाला. विद्यापीठ गेटसमोर अफाट गर्दी जमलेली. २१ दिवसांच्या धरती या नावाच्या मुलीला घेऊन मी आणि शांतारामही सहभागी झालेलो. ती गर्दी पाहून आपणही या लढ्यातील एक कार्यकर्ता होतो, याचा सार्थ अभिमान वाटला, अशा शब्दात मंगल खिंवसरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- स. सो. खंडाळकर

डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात झालेल्या सत्याग्रहाच्या वेळी मंगल खिंवसरा यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले होते. आजही मंगल खिंवसरा या नावाचा दरारा कायम आहे. महिलांवरील अन्याय- अत्याचाराच्या विरोधात त्या पेटून उठतात. त्यामुळे बलात्काऱ्यांना व पुरुषी मानसिकता जोपासणाऱ्यांना खिंवसरा यांचा एक धाक असतो. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झुंजार कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या खिंवसरा यांनी लोकमतशी संवाद साधला. नामांतर लढ्यात त्या प्रारंभापासून होत्या.

नामांतर लढ्यातील लोकमतचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत  खिंवसरा म्हणाल्या, ६ डिसेंबरच्या सत्याग्रहासाठी गनिमी काव्याने औरंगाबादेत दाखल झालेल्या स्त्री- पुरुष कार्यकर्त्यांची संख्या अफाट. त्यावेळी मी मिलिंद महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिकत होते. दारिद्र्य, गरिबी आणि शिक्षणाची भूक काय असते, हे मी तिथे पाहिले. मी तशी खात्यापित्या घरची. पण तिथल्या गरिबीमुळे मला वंचित समाजासाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली. आज मी जे काम करते, त्याची पाळेमुळे नागसेनवनात आहेत.

६ डिसेंबरच्या सत्याग्रहासाठी नागसेनवन परिसर, मिलिंदच्या वसतिगृहात अनेक महिला- भगिनींनी आश्रय घेतलेला. बदनापूरच्या रुपामाय कांबळे मला आजही आठवतात. त्यांच्याकडे एक कपड्याचे गाठोडे. त्याला त्या हातच लावू देत नव्हत्या. विचारलं तर त्या म्हणाल्या, दाखवू का काय आहे त्यात ते! आणि त्या गाठोड्यातला बाबासाहेबांचा फोटो त्यांनी दाखवला. मला काही झालं तरी चालेल, पण बाबाला काही होऊ देणार नाही, ही तिची भावना होती. हा प्रसंग आठवल्यानंतर डोळ्यातून आसवे आल्याशिवाय राहत नाहीत. आपण सर्वांनी मिळून बाबांचे नाव मोठे केले पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा, यांचा अंगीकार केला पाहिजे, अशी अपेक्षा मंगल खिंवसरा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा