शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Namantar Andolan: ‘माझं अख्खं कुटुंबच नामांतर लढ्यात, आई-वडिलांना कारावासही झाला’ : संजय जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:58 IST

लढा नामविस्ताराचा : मी त्यावेळी लहान होतो. भडकलगेटजवळील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये आठवी-नववीत शिकत होतो. तरीही विद्यार्थी  चळवळीत सक्रिय होतो. तसं तर नामांतराच्या लढ्यात माझं अख्खं कुटुंबच होतं आणि त्यांनी केलेला मोठा संघर्षही मी जवळून पाहत होतो, असं भारतीय दलित पँथरचे नेते संजय जगताप यांनी सांगितलं. 

- स. सो. खंडाळकर

भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष असलेले संजय जगताप यांनी एकेकाळी औरंगाबादची महापालिका गाजवली आहे. दलित पँथरच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणे, त्यासाठी संघर्ष करणे, आंदोलने करणे हा जणू त्यांचा स्थायीभावच बनून गेला आहे. संजय जगताप हे आक्रमक पँथर म्हणून ओळखले जातात.

संजय जगताप हे नामांतराच्या प्रश्नावर बोलत होते आणि ते ऐकून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगताप उद्गारल्या, मीबी त्या लढ्यात होतेच की अन् ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात लाँगमार्च-सत्याग्रहासाठी आलेल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी माझ्या हातची बेसन-भाकरी खाऊ घातली होती. 

माझे वडील दिवंगत उत्तमराव जगताप, आजोबा सदाशिवराव जगताप, हे सारे नामांतराच्या लढ्यात होते. क्रांतीचौकातील सत्याग्रहात माझ्या आई-वडिलांना अटक झाली. त्यांना हर्सूल कारागृहात नेऊन ठेवलं. पुढं माझाही या लढ्यातला सहभाग वाढला. मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी अटक केली. हर्सूल जेलमध्ये नेऊन दिवसभर ठेवलं गेलं आणि सायंकाळी सोडून देण्यात आलं होतं. या मोर्चात जयभीमनगरचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, अशी एक आठवण जगताप यांनी ताजी केली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.

त्यांनी सांगितले की, १९९४ साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय होत होता. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस यंत्रणा घेत होती. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जणू पाळतच होती. नामविस्तार झाला आणि आम्ही कार्यकर्ते जयभीमनगरात मिठाई वाटत सुटलो. एवढा आनंद आम्हाला झाला होता.नामविस्तार झाला; पण विद्यापीठाची प्रगती म्हणावी तशी झाली नाही. साऱ्या वादंगांना बाजूला सारून विद्यापीठाची प्रगती महत्त्वाची वाटते. ही प्रगतीच खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली ठरणार आहे. या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचार करण्याची व प्रसंगी संघर्ष करण्याची गरज असल्याची कळकळही जगताप यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा