शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Namantar Andolan : अंगावर १५० घाव झेलत जनार्दन मवाडे शहीद झाले; पण... : ताईबाई मवाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:53 IST

लढा नामविस्ताराचा : सुगाव, जि. नांदेड येथील जनार्दन मवाडे हे नामांतर लढ्यातील पहिले शहीद. त्यांच्या पत्नी ताईबाई म्हणतात, हल्लेखोरांपैकी एकानं घर जाळत असताना माझ्याच पदरानं माझं कुंकू पुसलं. घर जळत होतं आणि माझ्या तीन मुलांना जीव मुठीत धरून उतरंडीत लपवून ठेवावं लागलं. हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग मी कशी विसरू शकेन?

- स. सो. खंडाळकर

४ ऑगस्ट १९७८ चा तो दिवस. अजूनही अंगाचा थरकाप उडतो. ५०० हल्लेखोर आणि माझे पती जनार्दन मवाडे एकटे लढताहेत आणि अंगावर १५० घाव झेलून बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद होताहेत... हा प्रसंग  किती विसरावं म्हटलं तरी मी विसरू शकत नाही. आठवणींनी कधी डोळे पाणावतात, हेसुद्धा कळत नाही...’ अत्यंत भावनिक होऊन जनार्दन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई (वय ७०) ‘लोकमत’जवळ आपलं मन मोकळं करून घेत होत्या.

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताईबार्इंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक होईल का? असा सवाल उपस्थित केला आहे. १४ जानेवारी २०१६ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी.ए. चोपडे यांनी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र सभागृहात आम्हाला बोलावून आमचा सत्कार केला होता व त्याच  कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात येईल, असं सांगितलं होतं.

हे वृत्त त्यावेळी ‘लोकमत’सह इतरही वर्तमानपत्रांनी ठळक छापलं होतं; परंतु आता २०१९ उजाडलं तरी काहीच हालचाल दिसत नाही. याची मला आता चीड येत आहे आणि या मागणीसाठीही संघर्ष करण्याची वेळ यावी, याचं दु:ख होत आहे, असे नमूद करीत ताईबार्इंनी इशारा दिला आहे की, जर लवकर नामांतर शहीद स्मारक झालं नाही, तर मी कुलगुरूंच्या दालनातच बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि तिथंच शेवटचा श्वास घेण्याची माझी इच्छा आहे. ज्या विद्यापीठासाठी माझे पती शहीद झाले, त्यांच्यासह अन्य शहिदांचं स्मारक होऊ नये, ही बाब मला लाजिरवाणी वाटते, असे त्या त्वेषाने म्हणाल्या.

शहिदांच्या परिवाराकडे पुढाऱ्यांनीही लक्ष दिले नसल्याची खंत ताईबार्इंनी व्यक्त केली. सुगाव येथे जनार्दन मवाडे यांचं स्मारक व्हावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं नव्या पिढीला नामांतराचा संघर्ष, त्यातील बलिदान कळू शकेल; पण याकडेही कुणाचं लक्ष नाही याचंही खूप दु:ख वाटतं, असं ताईबाई रागारागातच सांगत होत्या.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा