शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

नमन.. जगत्ज्योतींना...

By admin | Updated: April 29, 2017 00:42 IST

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली.

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली. कव्हा नाका येथील महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. प्रारंभी सकाळी मनपाच्या वतीने बसवेश्वर उद्यानातील सिंहासनाधिष्ठित जगत्ज्योतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. श्री महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्यावरील चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी उद्यानात अनुयायांची गर्दी झाली होती. साठे चौकातील बसवेश्वर मंदिरात जन्मोत्सवाचा पाळणाही घालण्यात आला. ‘वीरशैव कक्कया समाज’ आणि ‘आपण सर्वजण’च्या वतीने शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.लातूर महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, महापौर अ‍ॅड. दीपक सूळ यांच्या हस्ते व शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वचनाने पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश दरडे, सुनील मिटकरी, महादेव खिचडे, प्रा. सुदर्शन बिराजदार, सारंग लहुरे, अ‍ॅड. स्वाती तोडकरी, रामलिंगअप्पा ठेसे, आर.सी. स्वामी, शरणाप्पा अंबुलगे यांना ‘बसवरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लिंगायत समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक पूजा पंचाक्षरी, प्रा. भाग्यश्री कौळखेरे तसेच चंद्रकांत बिराजदार, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, अ‍ॅड. दीपक मठपती यांचाही सत्कार करण्यात आला. सायंकाळी महात्मा बसवण्णा व बसववादी शरण जीवन चरित्र चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शिवदासअप्पा लखादिवे यांच्या हस्ते करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन ३० एप्रिलपर्यंत खुले राहणार आहे. त्यानंतर ‘आपण सर्वजण’ आणि वीरशैव कक्कया समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजल्यानंतर राजीव गांधी चौक, कामदार रोड, खाडगाव रोड, बसवेश्वर गल्ली, गवळी गल्ली, आझाद चौक, राचट्टे गल्ली, शेटे गल्ली आदी भागांतून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. बसवेश्वर महाविद्यालयासमोरील उद्यानात या मिरवणुकांचा समारोप झाला. साठे चौकातील बसवेश्वर मंदिरात पाळणा घालण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. अशा विविध कार्यक्रमांनी श्री महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली. (प्रतिनिधी)