औरंगाबाद : दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही नाशिक आणि औरंगाबाद येथे लोकमत महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ६२ वर्षीय अमरजितसिंग चावला हे आता नागपूर आणि कोल्हापूर येथे होणाºया लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.गेटगोर्इंगच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अमरजितसिंग चावला रविवारी औरंगाबादेत मुंबईहून येथे आले होते. १७ डिसेंबर रोजी औरंगाबादेत झालेल्या लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये त्यांनी २१ कि. मी. अर्धमॅरेथॉन पूर्ण करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. आता आपण नागपूर आणि कोल्हापूर येथे होणाºया लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंध असतानाही वयाच्या ४९ व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत ८२ अर्धमॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्या आहे. दहा वेळेस ४९ कि. मी. अंतराची मॅरेथॉन, तीन अल्ट्रा मॅरेथॉन आणि मुंबई येथे ५७ कि. मी.ची मॅरेथॉन १२ तासांत पूर्ण करणाºया अमरजितसिंग चावला यांचे लक्ष्य हे १0१ अर्धमॅरेथॉन पूर्ण करण्याचे आहे.
नागपूर, कोल्हापूर लोकमत महामॅरेथॉनमध्येही धावणार : अमरजितसिंग चावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:42 IST