औंढा नागनाथ : नगरपंचायत निर्मितीसाठी औंढा ग्रामपंचायतीने शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये नगरपंचायत करण्यासाठी बहुमताने जनतेने ठराव मंजूर केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश मोेरे यांनी दिली आहे.हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ येथे ग्रामपंचायतींना शासनाने नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायत करण्यास ग्रा.पं. कार्यालयांनी सहमती दर्शविण्यास ठराव यापूर्वीच दिले आहेत; परंतु ग्रामसभेतून एक ग्रामस्थांचा ठराव देणे आवश्यक असल्याने शनिवारी सकाळी १० वाजता या ग्रामसभेचे आयोजन ग्रा. पं. कार्यालयात करण्यात आले होते. या ग्रामसभेला गावातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, सरपंच वसंत मुळे, उपसरपंच माणिक पाटील, ग्रा.पं. सदस्य जी.डी. मुळे, सिंधु सोपान पाटील, शरद पाटील, दिलीप ठाकूर, जकी काझी, जब्बारखाँ पठाण, मनोज देशमुख यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे या प्रक्रियेसाठी नगर पंचायत निर्मितीसंदर्भात जर काही जनतेचे आक्षेप, आक्षेप व सूचना असतील तर ३० जूनपर्यंत तशा लिखित स्वरुपाचा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याची संधी जनतेला आहे. (वार्ताहर)
नगरपंचायत प्रक्रिया ठराव मंजूर
By admin | Updated: June 8, 2014 00:37 IST