गेवराई : आजवर लग्नमंडपातून धूम ठोकल्याचे ऐकिवात आहे. वधुकडील मंडळी लग्नासाठी नवरदेवाला आणायला गेली असता हळदीच्या अंगानेच नवरदेवाने धूम ठोकल्याची घटना तालुक्यात रविवारी घडली.तालुक्यातील कुंभारवाडी येथील दत्तात्रय भोजगुडे यांचा मुलगा बाळू याचा विवाह शिरूर कासार तालुक्यातील नारायणवाडी येथील मुलीशी ठरला होता. वधुकडील मंडळी नवरदेवास लग्नाला आणण्यासाठी रविवारी रात्री कुंभारवाडीला गेली असता त्यांना नवरदेव बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे वधूपक्षाकडील नातेवाईकांचा गोंधळ उडाला. आणायल्या गेलेल्या मंडळींनी गेवराई तालुक्यात इतरत्र नवरदेवाचा शोध घेतला, परंतु तो काही सापडला नाही.नवरदेव न सापडल्याने त्यांचा भाऊ प्रकाश भोजगुडे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात रविवारी याबाबत फिर्याद दिली आहे. नवरदेव नेमक्या कोणत्या कारणामुळे निघून गेला? याचे कारण समजलेले नाही.गेवराई पोलिसांनी सांगितले की, नवरदेव शिर्डीला असून तो परत गेवराईकडे येत आहे. आल्यानंतर नियोजित विवाह होणार असल्याचे नातेवाईक म्हणाले. (वार्ताहर)
हळदीच्या अंगानेच नवरदेवाने ठोकली धूम
By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST