शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

मार्चपूर्वी नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई; महाविद्यालयांना विद्यापीठाची ताकीद

By योगेश पायघन | Updated: October 31, 2022 19:58 IST

नो ॲडमिशन झोन किंवा संलग्नीकरण रद्दची होणार कारवाई; गुणवत्तेच्या शिक्षणासह सुविधांचा आग्रह

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांनी मार्चपूर्वी नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, पीएआर करून घ्या. अन्यथा संलग्नीकरण रद्दची कारवाई करू किंवा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालय ‘नो ॲडमिशन’ संवर्गात टाकण्याचा इशारा संलग्नित महाविद्यालयांना दिला आहे.

येत्या ६ महिन्यांत महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घ्यावे. तशा नोटिसा महाविद्यालयांना देण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या असून, मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करू, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी १० ऑक्टोबरला विद्यापीठ आढावा बैठकीनंतर दिला होता. त्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक काढून महाविद्यालयांना ३१ मार्च २०२३ पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात ४६४ महाविद्यालये आहेत. यापैकी केवळ १४६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले, तर ५५ महाविद्यालये मूल्यांकनासाठी अद्याप पात्रच नाहीत. या महाविद्यालयांना शासनाची मान्यता मिळून अद्याप ५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्या महाविद्यालयांचे अकॅडमिक ऑडिट करण्यात येत असून, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला आहे. नॅक मूल्यांकन पूर्ण करणाऱ्या १४६ महाविद्यालयांपैकी १० महाविद्यालयांनी मागील २ महिन्यांत नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेतले. ५० टक्क्यांहून अधिक महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेतले नसल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या आदेशाने संलग्नित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी ३१ मार्चचा अल्टिमेटम उपकुलसचिव आय. आर. मंझा यांनी परिपत्रकात दिला आहे.

एनईपी अंमलबजावणीकडे विद्यापीठाचे लक्ष‘जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सलर’ची (जेव्हीसी) बैठक २६ नोव्हेंबर रोजी होईल. त्या अनुषंगाने ‘एनईपी’ची अंमलबजावणी व नवीन शैक्षणिक धोरणात महाविद्यालयांचे क्लस्टर, महाविद्यालयांची स्वायत्तता, विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांची सुविधा, पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, संशोधन प्रक्रियेत मदत, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस अशा २१ मुद्द्यांवर विद्यापीठाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय