शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

मार्गनाट्याने रसिक प्रभावित, औरंगाबादमध्ये शारंगदेव संगीत समारोहात सांगीतिक मेजवानी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:37 IST

कोलकाता येथील पीयल भट्टाचार्य व त्यांच्या १८ जणांच्या ताफ्याने सादर केलेल्या मार्गनाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रांवर आधारित हे सादरीकरण लाजबाब होते एवढेच म्हणता येईल.

- मल्हारीकांत देशमुख 

औरंगाबाद : कोलकाता येथील पीयल भट्टाचार्य व त्यांच्या १८ जणांच्या ताफ्याने सादर केलेल्या मार्गनाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सूत्रांवर आधारित हे सादरीकरण लाजबाब होते एवढेच म्हणता येईल. सप्तलोक, सातचक्र, सप्तस्वरांच्या माध्यमातून मानवाने करावयाची मोक्षप्राप्ती हा विषय संकीर्ण भानकमध्ये गुंफताना नऊ भाषांचा वापर केलेला होता. पाणिनींच्या व्याकरणापासून ते स्वरांची निर्मिती, मानवी शरीरात या स्वरांचे अस्तित्व तार्किक पद्धतीने मांडण्यात आले होते. नवरसांची उत्पत्ती, प्रकृती व पुरुष अर्धनारी नटेश्वर दृष्टांत नाट्यीकरणातून फुलविण्यात आला होता. संगीत, नाट्य, नृत्य, अभिनय यांचा सुरेल संगम म्हणून या नृत्य नाटिकेत पाहायला मिळाला.

सायक मित्रा या युवा कलावंताने सूत्रधाराची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावली होती. तिन्ही नर्तिकेचे नृत्य विलोभनीय होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. नंदकुमार आणि संचाने केरळ वाद्यसंगीत प्रस्तुतीकरण केले. केरळमधील मंदिरातून वाजविल्या जाणार्‍या वाद्यांचे एकत्रित प्रस्तुतीकरण सुरू असताना सभागृहाला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाल्याचा अभास निर्माण होत होता. वादनातील भारदस्तपणा, चापल्य, समन्वय, दोन वाद्यांची जुगलबंदी श्रवणीय अशी होती. सादरकर्त्या कलावंतांचा सत्कार सचिव अंकुशराव कदम, संचालिका पार्वती दत्ता, रामली इब्राहिम यांच्या हस्ते करण्यात आला.

कमालीची शिस्त आणि पावित्र्यमहागामीच्या शारंगदेव महोत्सवाच्या समारोहात एकूणच कमालीची शिस्त जाणवत आहे. वेळा पाळण्याचे बंधन प्रत्येक घटक सांभाळताना दिसतो आहे. सकाळच्या सत्रात सप्रयोग व्याख्याने झाली, तीदेखील नियोजित वेळेतच. समारंभात कुठेही हारतुरे दिसले नाहीत. गुरुकुलचे शिष्य पारंपरिक पोषाखात तर होतेच; परंतु कलावंतांना प्रश्नोत्तराच्या वेळी अगदी धीटपणे प्रश्च विचारताना पाहायला मिळाले.

साधेपणाने उद्घाटनसमारोहाचे सकाळी संगीततज्ज्ञ पद्मश्री डॉ. उत्पल बॅनर्जी (कोलकता) यांच्या हस्ते कुठलीही औपचारिकता न बाळगता केवळ दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. करुणा विजयेंद्र (बंगळुरू), उडिसी नर्तक रामली इब्राहीम (मलेशिया), पीयल भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, संचालिका पार्वती दत्ता यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात पार्वती दत्ता यांनी मागील आठ समारोहांचा आढावा घेतला.

वाद्य परंपरेची ओळखकेरळमधील पारंपरिक वाद्य परंपरेची ओळख पी. नंदकुमार व त्यांच्या सहकलावंतांनी घडविली. केरळातील मंदिरातून वाजविल्या जाणार्‍या प्रमुख चर्मवाद्यांपैकी मिझायू, थीमिला, चेंडा, माधालम, इडाका वादनाची कला कर्नाटकी संगीतापेक्षा कशी निराळी आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. दिनेश वॉरियर, पी. नंदकुमार, श्रीजित, विनीश, एम. रमेशन या कलावंतांनी आपापली कला दाखविली. इडाका या वाद्यावर आनंदभैरवीचे वादन ही आगळीक पी. नंदकुमार यांनी आपल्या वादनातून दर्शविली.

नाद मिश्रणपारंपरिक वीणा वादनाची वैशिष्ट्ये दर्शविताना पीयल भट्टाचार्य व त्यांच्या तीन शिष्यांनी नाद मिश्रणाची चुणूक दाखविली. सायक मित्रा यांनी आलापीनी वीणा (एकतंत्री) अभिजित रॉय यांनी कच्छपी वीणा, तर सुभेंद्र घोष यांनी वक्रवीणा (नवतंत्री)चे नाद मिश्रण केले. भट्टाचार्य यांनी पारंपरिक दंडवीणा, आलबुवीणा, वक्रवीणा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

महागामीत सादर होणारे आजचे कार्यक्रमसकाळी १० वा. : डॉ. करुणा विजयेंद्र यांचे गौडाली नृत्य या विषयावर सप्रयोग व्याख्यान. सायं. ७ वा. ओडिसी नृत्य : रामली इब्राहिम (मलेशिया) झुमको - राजस्थानी नृत्य नाटिका. 

टॅग्स :danceनृत्यmgm campusएमजीएम परिसरAurangabadऔरंगाबाद