लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर शेड उभारुन कचरा संकलन केंद्र सुरु करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून शहरात कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केले होते. शहर स्वच्छ करण्यात पालिका प्रशासन कमी पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांनी कचरापूजन आंदोलन करुन प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर झालेल्या पालिका सभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. यावर पालिकेतील कर्मचाºयांची संख्या पाहता स्वच्छतेच्या मुद्द््यावर विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सत्ताधाºयांनी केले. त्यानंतर काही भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र तीही औटघटकेचीच ठरली. आता यावर प्रभावी उपाय राबविण्यावर गांभीर्याने पालिका प्रशासन व नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी विचार सुरु केला आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागात भिंतींवर घोषवाक्य लिहिण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील विविध शाळांतील मुलांना चित्रपटाद्वारे स्वच्छता आणि शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. सध्या शहरात सहा प्रभाग असून, या भागांत घंटागाड्या लावण्यात आलेल्या आहेत. या वाहनांद्वारे कचºयाचे संकलन करुन तो डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. यात इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब सुधारण्यासाठी आता शहरात पालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर शेड टाकून कचरा संकलन केंद्र सुरु करण्याच्या दिशेने विचार सुरु झाला आहे. त्या- त्या भागातील कचरा घंटागाड्यांद्वारे संकलन केंद्रावर आणला जाईल. त्यानंतर मोठ्या वाहनातून तो डम्पिंग ग्राऊंडवर आणून टाकला जाणार आहे. यातून शहर स्वच्छ होण्यास मदतच होईल, असा विश्वास मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी व्यक्त केला.
पालिका सुरू करणार कचरा संकलन केंद्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:11 IST