शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

By admin | Updated: July 1, 2014 01:06 IST

जालना : नगरपालिकेच्या प्रभागनिहाय विशेष स्वच्छता मोहिमेस सोमवारी नवीन जालना येथील सिंधीबाजार परिसरातून प्रारंभ झाला.

जालना : नगरपालिकेच्या प्रभागनिहाय विशेष स्वच्छता मोहिमेस सोमवारी नवीन जालना येथील सिंधीबाजार परिसरातून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी स्वत: एक ते दीड कि़मी. पायी फिरून या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले होते.पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नायक यांनी नगरपालिकेत सात तास बैठका घेऊन काही नवीन संकल्पना साकारण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती. त्यादृष्टीने दररोजची साफसफाई मोहीम वगळता प्रत्येक आठवड्यात एकाच प्रभागात सर्व सफाई कामगारांमार्फत स्वच्छता करून संपूर्ण प्रभाग स्वच्छ करण्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सुचविले होते. त्यानुसार या मोहिमेची सोमवारी अंमलबजावणी करण्यात आली.सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी नायक, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सिंधी बाजारमार्गे दे. राजा रोड, कडबी मंडी, सिंधी पंचायत, नाथबाबा गल्ली, अकेली बस्ती, जुना खवा मार्केट परिसर, महात्मा फुले भाजीमार्केट या भागात जाऊन तेथील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांची पाहणी केली. रस्त्यावर काही ठिकाणी बांधकाम साहित्या पडलेले जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. विनापरवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवून रहदारीला अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी स्वत: शहरात फिरून पाहणी केल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्यामुळे नागरिकही उत्सुकतेपोटी हा प्रकार पाहत होते. यावेळी सफाई कामगारांनी या भागातील स्वच्छता केल्याचे नगरपालिकेतील सूत्रांनी सांगितले. ही मोहीम प्रत्येक आठवड्यात राबविण्यात येणार आहे. मोहिमेस भेट देणारनगरपालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमांना आपण स्वत: भेट देऊन पाहणी करू, असे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चांगल्या उपक्रमांना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.