शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला; छत्रपती संभाजीनगरात चार लाख मतदारांची वाढ

By मुजीब देवणीकर | Updated: December 16, 2025 17:27 IST

मागील निवडणुकीत ११३ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. आता ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक होईल.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शहरात १५ जानेवारी रोजी मतदान होईल. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘कर’ असताना राज्य निवडणूक आयोग मतदान घेणार आहे. मागील पाच वर्षांपासून महापालिकेसाठी निवडणूक झाली नाही. दरम्यान मतदारांची संख्या ३ लाख ९८ हजारांनी वाढली आहे. 

शेवटची मनपा निवडणूक २०१५ मध्ये घेण्यात आली होती. या निवडणुकीत ७ लाख १९ हजार ४३ मतदार होते. २०२५ मध्ये मतदारसंख्या ११ लाख १८ हजार झाली. मागील निवडणुकीत ११३ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. सातारा-देवळाईचा मनपा हद्दीत समावेश झाल्यानंतर दोन वॉर्ड करून स्वतंत्र निवडणूक घेण्यात आली होती. आता ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक होईल. मागील निवडणुकीत ९५२ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यंदा इच्छुकांची संख्या वाढणार हे निश्चित.

शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे महापालिका होय. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना येथील राजकारणात बराच रस असतो. त्यामुळे महापालिका निवडणूक लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असते. दोन ते तीन वेळेस नगरसेवक झालेल्या अनेक राजकीय मंडळींना नंतर आमदार, खासदार होण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे राजकारणातील वाटचालीची ही पहिली पायरी असल्याचेही म्हटले जाते. महापालिकेचा कार्यकाल एप्रिल २०२० मध्ये संपला. त्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत. मागील पाच वर्षांपासून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत होते. ती प्रतीक्षा अखेर संपली. सोमवारी निवडणूक कार्यक्रमही घोषित झाला.

११३ पैकी दोन ठिकाणी झाली होती बिनविरोध निवडमागील आणि आताच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे २०१५ ची निवडणूक वॉर्ड पद्धतीने झाली होती. आता प्रभाग पद्धतीने होत आहे. प्रभागसुद्धा चार सदस्यांचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रभागात निवडणूक लढण्याची सवय कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे सर्वच इच्छुकांची दमछाक होत आहे. २०१५ मध्ये ११३ पैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे १११ जागांवर निवडणूक झाली होती. २२ एप्रिल २०१५ रोजी मतदान झाले होते. आता १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत ४ हजार ५०० कर्मचारी निवडणुकीला लागले होते. आता ती संख्या वाढून ६ हजार झाली. २०१५ च्या निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. २०१० मध्ये ५८ टक्के मतदान झाले होते.

१३९८ मतदान केंद्रेमतदान केंद्र प्रत्येक प्रभागातच राहतील, याची काळजी घेतली जाईल. त्यानुसार १३९८ मतदान केंद्र राहतील. प्रत्येक मतदान केंद्रावर २०० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.मतदान केंद्रावर सोयीसुविधा देण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. एकूण ५६०० कर्मचारी लागणार असून, १० टक्के जास्त याप्रमाणे ६१०० कर्मचाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन ठिकाणी होणार मतमोजणीनऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी जालना रोडवरील एसएफएस शाळा, उस्मानपुरा येथील शासकीय तंत्रशिक्षण विद्यालय (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज), रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज) या ठिकाणी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Announced; Voter Count Surges by Four Lakh

Web Summary : Municipal elections in Chhatrapati Sambhajinagar are set for January 15th, after a five-year hiatus. The voter count has increased by 3.98 lakh since the last election in 2015. This time, 115 corporators will be elected, with 1398 polling centers established.
टॅग्स :Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर