औरंगाबाद : शहर काँग्रेसतर्फे विविध १३ मागण्यांचे एक निवेदन मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले. शिष्टमंडळात अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, सय्यद आसीफ, मोईन हर्सूलकर, शेख कैसर, प्रकाश वाघमारे, जुबेर जहागीरदार आदींचा सहभाग होता.विभागवार पार्किंगसाठी मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी, हर्सूल भागास जायकवाडीचे पाणी पुरविण्यात यावे, या वॉर्डात दवाखाना व महिलांसाठी प्रसूतिगृह बांधण्यात यावे, मनपाचा प्रत्येक विभाग संगणकीकृत करण्यात यावा, अनधिकृत वसाहतींना गुंठेवारीत समाविष्ट करण्यात यावे, रोशनगगेट ते आझाद चौक रोडचे डांबरीकरण त्वरित करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.
शहर काँग्रेसतर्फे मनपाला तेरा मागण्यांचे निवेदन
By admin | Updated: December 23, 2015 00:04 IST