लातूर : शहरात महापालिकेच्या पुढाकाराने स्वंयसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे़ कुठे झाडे नसतील तर ती तातडीने लागवड करावी व या झाडाच्या संरक्षणासाठी योग्य नियोजन करावे, असा सल्ला आमदार अमित देशमुख यांनी मनपा पदाधिकाऱ्यांना दिला़ शुक्रवारच्या अंकात ‘लोकमत’ने यासंदर्भात स्टींग आॅपरेशन प्रकाशित केले होते़ जणू त्याची दखल घेऊन नाना नानी पार्क सुशोभीकरण समारोहात ते बोलत होते़ मंचावर खासदार डॉ़ सुनील गायकवाड, आमदार त्रिंबक भिसे, महापौर दीपक सूळ, उपमहापौर चांदपाशा घावटी, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त सुधाकर तेलंग, परिवहन सभापती पंडित कावळे, गटनेते रविशंकर जाधव, विरोधी पक्षनेते मकरंद सावे, रिपाईचे चंद्रकांत चिकटे, शिवसेनेचे गोरोबा गाडेकर, प्रभाग समिती सभापती डॉ. रुपाली साळुंके, पुजा पंचाक्षरी, केशरबाई महापुरे, कल्पना भोसले, आदींची उपस्थिती होती़ यावेळी आ देशमुख म्हणाले, लातूर शहराच्या विकासासाठी मनपाने नियोजित केलेली कामे मार्गी लावावीत़ नाना-नानी पार्क येथे सुशोभिकरण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना हे विरंगुळ्याचे ठिकाण होईल़ (प्रतिनिधी)
महापालिकेने झाडे जगविण्याचे नियोजन करावे : अमित देशमुख
By admin | Updated: July 16, 2016 01:14 IST