शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १५ शौैचालयांसाठी मनपाची कवायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:19 IST

पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहेत. एका शौचालयासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येत आहे. सीएसआर निधीतून ही कामे करता येऊ शकतात का? यादृष्टीने मनपा प्रशासन आणि खाजगी संस्था चाचपणी करीत आहे.

सीएसआर निधीचा शोध : एका शौचालयाचा बांधकाम खर्च २५ लाखऔरंगाबाद : शहरात किमान १०० सुलभ शौचालये उभारण्याचा मानस मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे. सुलभ इंटरनॅशनल या खाजगी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहेत. एका शौचालयासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येत आहे. सीएसआर निधीतून ही कामे करता येऊ शकतात का? यादृष्टीने मनपा प्रशासन आणि खाजगी संस्था चाचपणी करीत आहे. निधीची व्यवस्था होताच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

इंदूर शहरात १५० पेक्षा अधिक शौचालये आहेत. इंदूरची लोकसंख्या ३२ लाख आहे. घनकचऱ्यात मनपाने इंदूर पॅटर्न अवलंबिला आहे. आता शौचालयांसाठीही हाच पॅटर्न राबविण्यात येत आहे. महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे सीएसआर फंडातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेला यापूर्वी विविध कंपन्या, संस्थांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने शाळांमध्ये शौचालये बांधावीत म्हणून ८५ लाख रुपये दिले होते. महापालिकेने आजपर्यंत शौचालये बांधली नाहीत.

त्यामुळे खाजगी संस्था मनपावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा विपरीत परिस्थितीतही सीएसआर निधीचा शोध सुरू केला आहे. शहरात एकूण १५ ठिकाणी पहिल्या टप्प्यात शौचालये उभारण्यात येतील. पे अँड युज या तत्त्वावर ही शौचालये राहणार आहेत. जिथे शौचालयाचे बांधकाम सुरू करायचे आहे, त्या सर्व मनपाच्या मालकीच्या जागा आहेत. नगररचना विभागाकडे जागेच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोमवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आठ दिवस सीएसआर निधीचा शोध घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद