शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानाचा मुजरा ! छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची भूमी मालोजीराजे भोसले गढीचे बदलणार रूप

By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2024 11:44 IST

कामाला सुरूवात : भव्य अशी तटबंदी, प्रवेशद्वार, कारंज्यासह छताची होणार उभारणी

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरुळ याठिकाणी इतिहासाची साक्ष देणाऱ्या श्री. मालोजीराजे भोसले गढीचे लवकरच रूप बदलणार आहे. तब्बल १३ कोटी ६८ लाखांच्या निधीतून या गढीचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

वेरुळ येथील श्री. मालोजीराजे भाेसले गढी ही छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची भूमी आहे. वेरुळ लेण्यांच्या पूर्वेस दोन हेक्टर ५९ आर परिसरात ही गढी आहे. हा परिसर राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. मालोजीराजे भोसले गढीच्या परिसरात शहाजीराजे भोसले यांचे स्मारक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालोजीराजे भोसले गढीच्या संवर्धनाच्या कामाची प्रतीक्षा केली जात होती. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

२००५ मध्ये उत्खननयाठिकाणी २००५ ते २००६ मध्ये उत्खननात काही अवशेष आढळले होते. या उत्खननात जवळपास ६९ दुर्मिळ पुरातन वस्तू सापडल्या. त्यामध्ये लाल दगडात घडवलेली गणेशमूर्ती, भाग्य रत्ने, मातीचे दिवे, बांगड्या, कांस्य नाणी, चांदीच्या अंगठ्या, घराचा पाया इत्यादींचा समावेश होता. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास करून या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. आता संवर्धनाच्या कामात गढीच्या परिसरात भव्य असे छत उभारून उत्खननात सापडलेल्या भागांचे जतन केले जाईल. याठिकाणी विविध माहिती देणारे फलकही लावले जाणार आहेत. त्याबरोबर भव्यदिव्य अशी तटबंदी उभारली जाणार आहे. कारंजेही लावले जातील.

कामाला सुरूवातवेरूळ येथील श्री. मालोजीराजे भोसले गढीच्या जतनाचे काम सुरू झाले आहे. सध्या या जागेच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. याठिकाणी संरक्षक भिंत, माहिती फलक आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAjantha - Elloraअजंठा वेरूळ