शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा तुटवडा; रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:54 IST

४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे इंजेक्शन भेटेनाखासगी रुग्णालयांनी केले हात वर

औरंगाबाद: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. औरंगाबादसह १५ जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचार घेत असून रुग्ण मरणाच्या दारात असल्यामुळे नातेवाइकांना म्युकरमायकोसिसच्या आजारावर लागणारे इंजेक्शन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात ताटकळत बसावे लागते आहे. इंजेक्शनची मागणी करीत गुरुवारी ४९ रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा गाठला.

इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी पडत आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांतून रुग्ण औरंगाबादमध्ये येत असल्यामुळे शासनाने सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा या जिल्ह्यात करावा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे. प्रत्येक रुग्णासाठी अ‍ॅम्फोटेरेसीन बी हे ३ ते ५ इंजेक्शन दररोज लागत आहेत. १०० पेक्षा जास्त इंजेक्शनचा पुरवठा प्रशासनाला होत नाही. मागील ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्ण नातेवाइकांची धावपळ होत आहे. इंजेक्शन मिळत नाहीत, रुग्ण नातेवाइकांनी आपापल्या परीने ते उपलब्ध करावेत, असे सांगून खासगी रुग्णालये हातवर करीत आहेत.

४९ रुग्ण नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते. रुग्ण मरणाच्या दारात असून आता खासगी हॉस्पिटलदेखील आम्हाला सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे विनय साखला यांनी सांगितले. किरण हजारी म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील सदरील आजारावर उपचार मिळणे दुर्लभ झाले आहे. जावेद तांबोळी, सुदर्शन पवार, केतकी जोशी, नामदेव सोनवणे यांनीदेखील अशी भूमिका मांडली. बाहेर इंजेक्शन भेटत नाही, प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही. या सगळ्या खेचाखेचीत रुग्णांची हेळसांड होत असल्याचे मत नातेवाइकांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीइंजेक्शनचा तुटवडा आहे. शासनाकडून वाढीव इंजेक्शन मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जसे इंजेक्शन पुरविले जात आहेत, तसे रुग्णांचा आकडा पाहून त्यांना दिले जात आहेत. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबादला विशेष पुरवठा व्हावारेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी औरंगाबादेत राज्यभरातून रुग्णाचे नातेवाईक येत राहिले. तसेच आता म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी शहरात राज्यातील १५ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. औरंगाबादचे २५८ रुग्ण असून ४४६ रुग्ण मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे औरंगाबादला इंजेक्शनचा रुग्ण आकडा पाहून पुरवठा होणे गरजेचे आहे. ठाणे, नंदुरबार, सोलापूर, पुणे, धुळे, अकोला, लातूर, नाशिक, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, जालना येथील रुग्ण सध्या औरंगाबादमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये विशेष पातळीवर इंजेक्शनचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबाद