शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis Cases :  घाटी रुग्णालयात ११ रुग्णांची ‘म्युकरमायकोसिस’वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 12:25 IST

Mucormycosis Cases : घाटीत दाखल रुग्णांच्या संख्येत रोज भर पडत असून, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६२ झाली आहे.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात.

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ सध्या ‘म्युकरमायकोसिस’च्या नावाची धडकी भरत आहे. परंतु वेळीच औषधोपचार घेतले तर या आजारावरही मात करणे शक्य आहे. घाटी रुग्णालयातून आतापर्यंत ११ रुग्ण या आजारावर यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहे.

बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) जंतूमुळे हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले. घाटीत दाखल रुग्णांच्या संख्येत रोज भर पडत असून, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. तर आतापर्यंत ११ रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. वसंत पवार, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. शैलेश निकम, डाॅ. सोनाली लांडगे आदींसह परिचारिका, आरोग्य कर्मचार्यांनी परिश्रम घेेतले. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डाॅ. येळीकर यांनी सांगितले.

खासगीतील रुग्णांसाठी नातेवाईकांची धावपळम्युकरमायकोसिसच्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात. जिल्ह्याला आतापर्यंत २८० इंजेक्शन मिळाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत इंजेक्शन अपुरी पडत आहेत. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन मिळते. परंतु पुरवठा कमी असल्यानेे नातेवाईकच इंजेक्शनची शोधाशोध करीत आहेत.

रुग्णांनी खबरदारी घ्यावीकोरोना झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ मास्कचा वापर करावा. धुळीत जाण्याचे टाळावे. मधुमेह नियंत्रणात ठेवावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या तिघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.-डाॅ. वसंत पवार, कान-नाक-घसा विभाग, घाटी

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद