शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

एमएसईबी, ग्रामीण पोलीस विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:49 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमएसईबी संघाने पीडब्ल्यूडी संघावर, तर ग्रामीण पोलीसने आयुर्विमा संघावर मात केली. इनायत अली सय्यद याचा अष्टपैलू खेळ, शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण आणि अजय काळे यांची दणकेबाज अर्धशतके ही आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

ठळक मुद्देस्वप्नील, इनायत, अजय चमकले

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरूअसलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमएसईबी संघाने पीडब्ल्यूडी संघावर, तर ग्रामीण पोलीसने आयुर्विमा संघावर मात केली. इनायत अली सय्यद याचा अष्टपैलू खेळ, शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण आणि अजय काळे यांची दणकेबाज अर्धशतके ही आज झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.पहिल्या सामन्यात एमएसईबी संघाने इनायत सय्यदच्या ७ चौकार व एका षटकारासह ५0 चेंडूंत ५७ आणि स्वप्नील चव्हाणने अवघ्या २३ चेंडूंतच ४ षटकार व २ चौकारांसह केलेल्या वादळी ५१ धावांची खेळीच्या बळावर ५ बाद १७७ धावा ठोकल्या. सचिन पाटीलने ३७ चेंडूंत ८ चौकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. पीडबल्यूडीकडून नीरज शिमरे याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडी संघ १४४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून नीरज शिमरे याने ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५४ व योगेश राठी याने २३ धावांचे योगदान दिले. एमएसईबीकडून इनायतअली सय्यद याने २२ धावांत ४ गडी बाद केले. पांडुरंग धांडेने ३, तर सचिन पाटीलने १ गडी बाद केला.दुसºया सामन्यात आयुर्विमा संघ ८८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अभिजित भगतने ३२ व विल्यम लालसरेने २५ धावा केल्या. ग्रामीण पोलीसकडून संदीप जाधवने ३ व अजय काळे व विकास नगरकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलीसने विजयी लक्ष्य ९.१ षटकांत १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून अजय कोने ३२ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ५३, वसीम खानने २७ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून संजय भुसारे याने १ गडी बाद केला.