शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एमआर, स्कोडा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:12 IST

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या सहाव्या राम कमला औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत एमआर इलेव्हन संघाने आयुर्विमा संघावर तर स्कोडा आॅटो संघाने पीडब्ल्यूडी संघावर १० धावांनी मात केली. विपुल भोंडे व सिराज काझी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या सहाव्या राम कमला औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत एमआर इलेव्हन संघाने आयुर्विमा संघावर तर स्कोडा आॅटो संघाने पीडब्ल्यूडी संघावर १० धावांनी मात केली. विपुल भोंडे व सिराज काझी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात एलआयसी संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद ८० धावा केल्या. त्यांच्याकडून दिनेश नाकीलने २८ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सिराज काझीने ७ धावांत ३ गडी बाद केले. त्याला व्यंकटेश सोनवलकर व सय्यद जलील यांनी २ गडी बाद करून साथ दिली. प्रत्युत्तरात एमआर इलेव्हन संघाने ६ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २० चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३० व शेख वसीमने १२ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह २८ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून सुशील गणोरकरने २९ धावांत ३ व दिनेश नाकीलने २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात स्कोडा आॅटोने शैलीदार फलंदाज करून विपुल भोंडे याच्या ३३ चेंडूंतील ६ चौकारांसह फटकावलेल्या ५२ धावांच्या बळावर २० षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. विपुल भोंडेशिवाय संदीप खोसरेने १८ धावा केल्या. पीडब्ल्यूडीकडून मनोज घोडकेने २२ धावांत ३ आणि नीरज देशपांडेने १६ धावांत ३ गडी बाद केले. मनोज दाभाडेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडीचा संघ १९.४ षटकांत ९८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून मनोज दाभाडेने ३० व असद अली याने २८ व योगेश चव्हाणने १६ धावा केल्या. स्कोडा संघाकडून विजय मेहेत्रेने १५ धावांत ४ व योगेश भागवतने ४ धावांत ३ गडी बाद केले. शेख नझीमने २६ धावांत २ बळी घेतले.