शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत केलेली स्थानबद्धता रद्द करून याचिकाकर्त्याची तात्काळ सुटका करण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:53 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील बाळू वामन पाटोळे (३५) याला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा आदेश आणि सल्लागार मंडळाच्या अहवालाआधारे हा आदेश कायम करणारा राज्य शासनाच्या गृह विभागाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी रद्द केला, तसेच याचिकाकर्ता बाळू पाटोळे याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

ठळक मुद्दे या निकालपत्राची प्रत औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि गोवा येथील विधिसेवा समितीकडे पाठविण्याचाही आदेश

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील बाळू वामन पाटोळे (३५) याला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा आदेश आणि सल्लागार मंडळाच्या अहवालाआधारे हा आदेश कायम करणारा राज्य शासनाच्या गृह विभागाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी रद्द केला, तसेच याचिकाकर्ता बाळू पाटोळे याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.बाळू पाटोळे याला पोलीस आयुक्तांनी विविध कायद्यांतर्गतच्या विविध कलमांखाली गुन्ह्यांमध्ये सहभागी दाखवून १५ आॅक्टोबर २०१८ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले होते. या आदेशाला त्याने आव्हान दिले होते.सदर व्यक्तीला १ आॅक्टोबर २०१८ रोजी मुंबई येथील सल्लागार मंडळापुढे (अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) हजर करून सुनावणी झाली असता सल्लागार मंडळाने सदर व्यक्ती ही धोकादायक असून, पोलीस आयुक्तांनी केलेली कार्यवाही योग्य आहे. सदर व्यक्ती एक वर्षासाठी स्थानबद्धतेस योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाला २ नोव्हेंबर २०१८ रोजी दिला होता. गृह विभागाने सल्लागार मंडळाचा अहवाल गृहीत धरून बाळूच्या स्थानबद्धतेचा आदेश कायम केला. बाळूने अ‍ॅड. राजेंद्र सानप यांच्यामार्फत या आदेशास खंडपीठात आव्हान दिले होते.याचिकेच्या सुनावणी वेळी अ‍ॅड. सानप यांनी भारतीय राज्यघटना आणि एम.पी.डी.ए. कायद्यातील विविध कलमांमध्ये ‘धोकादायक व्यक्ती कोण आणि शिक्षा काय असावी’ याबाबत सविस्तर युक्तिवाद करून याचिकाकर्त्याची बाजू मांडली. एम.पी.डी.ए. कायद्यात झोपडपट्टी दादा, अमली पदार्थांची तस्करी करणारे, हातभट्टीवाले, वाळू माफिया, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि व्हिडिओ, सी.डी.ची कॉपी करून विकणारे अशा व्यक्तींचा धोकादायक व्यक्तींमध्ये समावेश होतो. ज्यांच्यामुळे सामाजिक कायदा आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकते, अशा व्यक्ती धोकादायक असतात. अ‍ॅड. सानप यांनी राज्यघटना, एम.पी.डी.ए. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत याचिकाकर्ता कसा निर्दोष आहे, त्याच्या स्थानबद्धतेचा आदेश कसा चुकीचा आहे, हे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.सुनावणीअंती खंडपीठाने राज्यघटनेचे कलम २१ आणि २२ तसेच एम.पी.डी.ए. कायद्यातील कलम व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्याआधारे ५८ पानांचा न्यायनिर्णय पारित करून वरीलप्रमाणे आदेश दिला. अ‍ॅड. सानप यांना अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Courtन्यायालयAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस