शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

By admin | Updated: March 11, 2017 00:35 IST

जालना :जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचारी संघटनने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले.

जालना : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लेखा कर्मचाऱ्यांना राजपत्रित दर्जा देण्यात यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचारी संघटनने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले.शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या ग्रेडपेच्या संदर्भात जि.प. कर्मचाऱ्यांबरोबर शासनाने दुजाभाव करून ग्रेड पे लागू केला नाही. याबाबत संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी न्यायालयात सुध्दा दाद मागितली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. न्यायालयीन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यानी दिले होते. याला आत्ता २७ वर्षे होत असून, ते अद्यापही पूर्ण करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांत संताप आहे. जि.प.च्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याला राजपत्रितचा दर्जा देण्यात यावा यासाठी सुध्दा वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केली. परंतु या मागणीकडे सुध्दा शासनाने दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे याबाबत न्यायालय आदेशालासुध्दा ग्रामविकास मंत्र्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता शासनाने त्यावर अभ्यासगट तयार करून ही मागणी नाकारल्याचे निवेदनात म्हटले आहे. नेमण्यात आलेल्या समितीने राजपत्रित दर्जा देण्याची आवश्यकता नाही अशी शिफारस केल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. राज्य कर्मचारी आणि जि.प. कर्मचारी यांचे पदोन्नतीचे पदे वेगवेगळी आहेत. राज्याला ८० जि.प. २० टक्के पदोन्नती आहे. यात वाढ करून कर्मचाऱ्यांना समसमान पदोन्नती देण्याची सुध्दा मागणी यावेळी करण्यात आली. अंशदायी पेन्शन योजना बंद करून नियमित पेन्शन योजना लागू करावी, ग्रामीण हमी योजना व इंदिरा आवास योजना अंतर्गत पंचायत स्तरावर सहाय्यक लेखाधिकारी पद निर्माण करणे, जि.प. लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारी तसेच सहाय्यक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती देण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देण्यात यावे, जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयाप्रमाणे पंचायत समितीस्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, तसेच पंचायत समितीस्तरावर सहाय्यक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावेत, वित्तीय व लेखा सेवा वर्ग ३ ची परीक्षा दरवर्षी नियमित घेण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे जॉब कार्ड तयार करावे, पंचायत स्तरावर लेखाधिकारी वर्ग २ चे पद निर्माण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमारे काळ्या फिती लावून आंदोलन केले. निवेदनावर लेखा कर्मचारी संघटनचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, सचिव गजानन मगर, रामेश्वर चव्हाण, इकबाल सिद्दीकी, दीपक जोशी, रवि कोरडे, रवि बोर्डे, शेख हारूण आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.