शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलसमोर धरणे आंदोलन

By admin | Updated: June 10, 2014 00:54 IST

परंडा : रब्बीचे दुष्काळी व गारपिटीची मदत तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

परंडा : तालुक्यातील वगळलेल्या गावांतील शेतकऱ्यांना रब्बीचे दुष्काळी व गारपिटीची मदत तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे मराठवाडा संघटक गोरख भोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. गेल्या चार पाच वर्षांपासून परंडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेले आहेत. त्यातच अचानक आलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागासह रबीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने यासबंधी समक्ष पाहणी करुन पंचनामे करत मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, परंडा तालुक्याच्या महसूल विभागाने मर्यादीत गावातील नुकसानीचेच पंचनामे करून मदतीचे वाटप केले. त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वगळण्यात आलेल्या गावांचा पुन्हा यादीत समावेश करुन मदत द्यावी, अशी मागणीही संघटनेने यावेळी केली. तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावच धरणे आंदोलन सुरु केल्याने कार्यालयात जाण्या-येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. यावेळी सघंटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली. दरम्यान, प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मराठवाडा संघटक गोरख भोरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. अखेर पाडळे यांनी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर अनुदान देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास खोसरे, शिवानंद तळेकर, शकंर तिंबोळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)