शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:28 IST

ध्वजस्तंभावर ठिय्या : महिनाभरापासून शेतकरी त्रस्त

सोयगाव : सोयगावसह तालुकाभर महिनाभरापासून शेतकऱ्यांना सातबारा उतारे मिळत नसल्याने चकरा मारून वैतागलेल्या शेतकºयांनी सातबारे मिळण्यासाठी शासनाचा व सर्व्हर कंपनीचा निषेध करत बुधवारी ध्वजाच्या स्तंभावर बसून तासभर आंदोलन केले. आॅनलाईन आणि डिजीटल सातबाºयाच्या जाचातून मुक्त करून स्वातंत्र्य देण्याची नवीन मागणीही शेतकºयांनी केली.सर्व्हर बंदअभावी तालुक्यात महिनाभरापासून शेतीचे उतारे मिळत नसल्याने सध्या शेतकºयांना बँकेचे पीककर्ज, पीकविमा भरण्यासाठी अडचण येत आहे. तालुक्यातील शेतकरी दररोज तहसील कार्यालयात चकरा मारून कंटाळले होते. त्यामुळे बुधवारी वैतागलेल्या शेतकºयांनी ध्वजाच्या स्तंभावर बसून अभिनव आंदोलन केले. स्वातंत्र्यदिनाच्या आधी या डिजीटल व आॅनलाईनच्या जाचातून स्वातंत्र्य देण्याची अनोेखी मागणी निवेदनाद्वारे यावेळी शेतकºयांनी केली. नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणानंतर सातबारे मिळण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन तासाभरात माघारी घेण्यात आले.नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी कर्मचारी रवानाडिजिटल सातबारे मिळण्याचे संकेतस्थळ महिनाभरापासून सुरु होत नसल्याने महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगळवारी रात्रीच नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. बंद पडलेले पोर्टल सुरु न होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने सोयगाव तालुक्यासाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय सातबारे देण्याचा प्रयोग आखत असल्याने सोयगाव तहसील कार्यालयाचे पाच महसूल कर्मचारी तातडीने प्रशिक्षणासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा