परभणी: जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर मंगळवारी मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यास विनाअट सेवेत कायम समावून घ्यावे, अनुकंपाधारकांना सेवेत घ्यावेत, बंद केलेले सहाय्यक अनुदान यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व के.के. आंधळे यांनी केले. या प्रसंगी राम कांबळे, आनंद मोरे, मुक्तसीद खान, अनुसयाबाई जोगदंड, के.के. भारसाखळे, सुधाकर पालकर, काशीनाथ उबाळे, अशोक शिंदे, जे.डी. देशमुख, एल.एम.सोळंके, भगवान बोडखे, सुनिता आहिरे, अब्दुल जावेद यांच्यासह कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता. (प्रतिनिधी)
मनपा-ऩप़ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Updated: July 2, 2014 00:15 IST