लालखाँ पठाण , गंगापूरगंगापूर सहकारी साखर कारखाना सुरु होणार या एका वाक्याने तालुक्यातील जनतेत नवचैतन्य निर्माण झाले असून मृत अवस्थेतील कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी आ. प्रशांत बंब यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. बंद पडलेला कारखाना पुढील वर्षात सुरु होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. गंगापूर कारखाना २००८ मध्ये बंद पडला व कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने सहकार बँकेने कर्ज वसुलीसाठी कारखाना ताब्यात घेऊन तो राजाराम फूडस् प्रा.लि. यांना २९ कोटी १ लाख रूपयांत विक्री केला होता. तेव्हापासून कारखाना बँकेच्या ताब्यात आहे. कारखाना बंद पडल्याने कामगाव, शेतकरी देशोधडीला लागले. हक्काचा कारखाना बंद पडल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना आपला उस इतर करखान्याला कवडीमोल दरात विकावा लागला. कारखाना स्थळावर उसतोड मजूर, कर्मचारी यांच्यावर चालणारा विविध प्रकारचा व्यवसाय देखील बंद पडल्याने व्यापारी देखील स्थलांतरित झाले. कारखान्याला वाली राहिला नाही. त्यामुळे गंगापूर ते कारखाना, कारखाना ते कारखाना फाटा, कारखाना ते बगडी अशा असंख्य गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाताहत झाली. गेल्या १० वर्षात याकडे कोणत्याच पुढाऱ्याने लक्ष दिले नाही. कारखाना वगळता जामगाव शिवारातील नागरिकांचा मूळ व्यवसाय शेती निगडित असल्याने ते सध्यस्थितिला तग धरून आहेत. २०१५ मध्ये कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक पार पडून कारखान्यावर आ. प्रशांत बंब यांच्या ताब्यात आला. बँकेच्या ताब्यातील कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन न्यायालयात दावे दाखल केले होते. या ठिकाणी कारखान्याच्या विरोधात निकाल गेला. या निकालाविरोधात कारखान्याने वरिष्ठ न्यायालयात धाव घेऊन कोर्टाच्या आदेशानुसार ९ कोटी रूपयांचा भरणा करुन कारखान्याची बाजू मांडली.
गंगापूर साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली
By admin | Updated: October 15, 2016 01:20 IST