शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या फळ बाजारात ‘कोकणच्या राजा’ची चलती

By admin | Updated: April 30, 2017 23:51 IST

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बाजारात मोठी उलाढाल झाली. लातूरचा फळबाजार कोकणच्या राजाने बहरला आहे. गंजगोलाई परिसर आणि हनुमान चौक ते गुळ मार्केट या दरम्यान आंब्यांचा बाजार थाटण्यात आला आहे. या फळबाजारात लातूरसह कर्नाटक, कोकण आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी आंबे घेऊन दाखल झाले आहेत. कोकणच्या हापूस आंब्याची दोन डझनांची पेटी ८०० ते १२०० रुपयांमध्ये ग्राहकांना मिळू लागली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा डझनाचा भाव परवडत नसल्याने पर्याय म्हणून केशर आंबे खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांची गर्दी आहे. श्रीमंतांचा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची सध्या फळबाजारात चलती असली, तरी या आंब्यांची खरेदी मोजक्याच ग्राहकांकडून होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल, अशा आवाक्यात असलेल्या केशर आणि नीलम आंब्यांची मोठी उलाढाल लातूरच्या बाजारात आहे. शिवाय, आंध्र आणि कर्नाटकातील तोता-मैना या जातीच्या आंब्यांना ग्राहकांतून विशेष मागणी आहे. चवीसाठी गोड आणि रसाळ असलेल्या नीलम, केशर त्याचबरोबर तोता-मैना या आंब्यांची मागणी आता वाढली आहे. दिवसेंदिवस फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर हे आंबे दाखल होत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या आंब्यांची अनेकांनी प्रथमच खरेदी केली. गेल्या दोन दिवसांतील उलाढाल लाखो रुपयांच्या घरात आहे. (प्रतिनिधी)