बीड: विविध मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या मान्य करण्याची मागणी केली़ याप्रसंगी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती़तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा दर्जा वाढवाकृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रीमंडळाने २००४ दरम्यानच निर्णय घेतलेला आहे़ मात्र अद्याप पर्यंत शासनाच्या या निर्णयाची अमलबजावणी झालेली नाही़ शासन निर्णयाची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ यांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले़जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कृषी व सहकार विभागाच्या निर्णयानुसार मदत करावी़ कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अनेकवेळा मारहान होते़ अशावेळी अजामीन गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे़ यापुर्वी अनेकवेळा कृषी कर्मचाऱ्यांना मारहानीच्या घटना घडलेल्या आहेत़ यामुळे शासनाने याची दखल घ्यावी़ कृषी सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांतून शंभर टक्के कृषी पर्यवेक्षक पदे भरावेत आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या़ केलेल्या मागण्या मान्य न केल्यास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेमुदत संपावर जाण्याचा ईशारा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ यांच्या वतीने देण्यात आला आहे़ग्रामसेवकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करामाजलगाव तालुक्यातील ब्रह्मगाव येथे एस.बी. लेंडाळ हे ग्रामसेवक आहेत. मागील एक महिन्यापासून ते गावावर आलेलेच नाहीत. असे असतानाही गटविकास अधिकारी हे लेंडाळ यांना पाठीशी घालत आहेत. लेंडाळ यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी ब्रह्मगाव येथील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटवाबीड तालुक्यातील पिंपळनेर येथील गट नं. ४५९, ४६० येथील १ हेक्टर ९५ आर जागा शाळेच्या लगत आहे. यामुळे ही जागा अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या ताब्यात आहे. याठिकाणी बाजुच्या शाळेतील विद्यार्थी खेळत असतात. मात्र शेख चाँद शेख मियॉ यांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. तसेच या जागेतील झाडेही तोडली आहेत. १९४० पासून हे मैदान गावकऱ्यांच्या ताब्यात असताना देखील याठिकाणी अतिक्रमण होत आहे. यामुळे बाजुच्या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळत नाही. अतिक्रमण हटवून मैदान मोकळे करुन द्यावे, अशी मागणी पिंपळनेरकरांची आहे. हमाल मापाडी संघटनेचे उपोषणथकित मजुरीसाठी गोदाम हमालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मागील वर्षभरापासून थकित मजुरी व मजुरीतील फरक हमालांना मिळावा, अशी मागणी राजकुमार घायाळ यांनी केली. यावेळी बप्पासाहेब जाधव, विठ्ठल धापसे, विलास हातागळे, अर्जुन काळे, देवीदास काळे, दत्ता जाधव, सचिन वाघ सहभागी होते. (प्रतिनिधी)
मंगळवार ठरला आंदोलन वार
By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST