शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर पोखरणे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST

खंडाळा परिसर : खदानीतून गौण खनिजाची विल्हेवाट

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथील खदानीतून मागील काही दिवसांपासून क्रशरद्वारे मोठ्या प्रमाणावर दगडाचा अनधिकृत उपसा होत असल्याने येथील टेकड्या बोडख्या झाल्याचे चित्र आहे. यातून गौण खनिजाची विल्हेवाट लावली जात असल्याने लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.महसूल विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.या परिसरात प्रत्येक खाणीतून रोज सरासरी ४० ते ५० ट्रक दगडांची खोदाई आणि वाहतूक सुरु असते. प्रत्यक्षात मात्र पाच किंवा दहा ट्रकचीच रॉयल्टी तिजोरीत भरली जाते. खुल्या बाजारात क्रशरधारक दहा ते पंधरा हजार रुपयांना एक ट्रक दगड, खडीची विक्री करतात. या व्यवहारामागे त्यांना सरासरी एक ट्रकला चार ते पाच हजार रुपयांची कमाई होते.खंडाळा परिसरात बऱ्याच ठिकाणीबेकायदेशीरपणे दगडांच्या खाणी आहेत. महसूल विभागाने गेल्या वर्षी खंडाळा परिसरातील या खाणीवर कारवाई केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जेथे दगड संपले अशा ठिकाणी डोंगराळ भागात सर्वत्र भले मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. या व्यवसायामुळे काही वर्षात खंडाळ्यातील डोंगर नष्ट होण्याची भीती आहे.महसूल व स्थानिक ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. डोंगर पोखरण्यास माफियांना सर्रास मूकसंमती येथे दिली जाते. या खाण व्यवसायात किती परवानाधारक ठेकेदार आहेत, याची तपासणी महसूल विभागाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुरुंग स्फोटके येतात कोठून?खाणीवर दगडाच्या उत्खननासाठी लागणारी सुरुंग स्फोटके कोठून येतात व ती कोठे साठवली जातात, याचा महसूल विभागाने किंवा सुरक्षा यंत्रणेने शोध घेतलेला नाही.खंडाळा परिसरातील दगड खाणींवर स्फोटकांची आतषबाजी होत असून अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. दगड खाणीवर सुरुंग स्फोट करणारा कामगार हा प्रशिक्षित असावा, मात्र दगड फोडणाºया मजुरांकडून ही जोखमीची कामे करून घेतली जातात.धुळीचे साम्राज्यदगडखाणींमुळे परिसरातील शेतीच धोक्यात आली आहे. खंडाळा गावाजवळ तब्बल बारा स्टोन क्रेशर व पंधरा दगडांच्या खाणी आहेत. या दगडांच्या खाणींजवळ स्टोन क्रशर सुरु असतात. त्यामुळं परिसर कायम धुळीत बुडालेला असतो. धुळीमुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून पाण्याची भूजल पातळी खालावत चालली आहे. लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. दगडाच्या खाणी गावाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे भूसुरुंग स्फोटात उडालेले दगड मानवी वस्तीत येऊन पडतात. अशा घटनांमध्ये अनेक गावकरी जखमी झाले आहेत. शिवाय स्फोटांच्या हादºयाने अनेक घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत.तक्रार करुनही उपयोग नाहीयाविषयी खंडाळा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आम्ही याविषयी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली आहे, असे खंडाळ्याचे माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य साजीद खान यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार