शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सॉफ्टवेअर इंजिनिअरची प्रेरक भरारी; जन्मजात अंधत्व, नंतर मधुमेह, आता देशभर करतो जागृती

By संतोष हिरेमठ | Updated: December 11, 2023 11:42 IST

रोज ५ वेळा इन्सुलिन : हैदराबादच्या लक्ष्मीनारायणाची दुहेरी संकटावर मात करून आयुष्यात भरारी

छत्रपती संभाजीनगर : जन्मत: अंधत्व. अंधत्वावर मात करून आयुष्य पुढे नेत असतानाच इयत्ता दहावीत असताना मधुमेहाचे (टाइप-१) निदान झाले. लहान वयातच अंधत्वाबरोबर ‘टाइप-१ डायबेटिस’चे संकट. दररोज इन्सुलिन घेण्याची वेळ. या सगळ्या परिस्थितीतही हार न मानता आयुष्यात भरारी घेत तो साॅफ्टवेअर इंजिनिअर बनला. एका नामांकित कंपनीत काम करण्यासह डायबेटिस एज्युकेटर म्हणून तो देशभर जनजागृतीसाठी भटकंती करतो. अगदी एकटाच.

हा अवलिया आहे हैदराबाद येथील २८ वर्षीय लक्ष्मीनारायणा वरीमडुगू. शहरात बालमधुमेहावरील राष्ट्रीय परिषदेनिमित्त तो शहरात आला असता त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्याने मनमोकळेपणाने त्याचा प्रवास उलगडला. लक्ष्मीनारायणा म्हणाला, आंध्र प्रदेशातील अनंतपूरम येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. जन्मत: अंधत्व होते. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अंधत्वासोबत जीवन पुढे जात असताना दहावीत अचानक टाइप-१ डायबेटिसचे निदान झाले. रोज ५ वेळा इन्सुलिन घेण्याची वेळ ओढवली. सुरुवातीला ते अवघड वाटले. मात्र, हळूहळू त्याच्यासोबत जगण्याची सवय झाली. साॅफ्टवेअर इंजिनिअरपर्यंत मजल मारली. हैदराबाद येथील एका कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. बालमधुमेही आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आजाराला कशाप्रकारे सकारात्मकरीत्या सामोरे यावे, यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचाही प्रयत्न करतो. त्यासाठी आजवर विविध शहरांत गेलो आहे. अगदी बालमधुमेहीच्या घरी जाऊनही संवाद साधतो. माझ्यामुळे जर कोणाला प्रेरणा मिळत असेल तर यापेक्षा मोठा आनंद नाही, असे लक्ष्मीनारायणा म्हणाला.

आजार कोणताही असो, आत्मविश्वास दाखवामी पूर्वी मुंबईतही काम केलेले आहे. आता हैदराबादला काम करतोय. मुलाखतीत मी अंध आहे, मला टाइप-१ डायबेटिस आहे, हे सांगण्यापेक्षा माझ्यातील आत्मविश्वास दाखविला. कोणताही आजार तुमच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, असे लक्ष्मीनारायणा म्हणाला.

४ वेळा हाफ मॅरेथाॅन, आता पूर्ण मॅरेथाॅनची तयारीलक्ष्मीनारायणा म्हणाला, मी आतापर्यंत ४ वेळा हाफ मॅरेथाॅन धावलो आहे. आता ४२ कि.मी.च्या पूर्ण मॅरेथाॅनचीही तयारी करीत आहे. बालमधुमेहींच्या कुटुंबीयांनाही या आजाराविषयी शिक्षित करण्याची गरज आहे.

टॅग्स :diabetesमधुमेहAurangabadऔरंगाबाद