तुळजापूर : शहरातील मंगळवारपेठ भागातील खंडोबा मंदिराजवळ एका चार ते पाच महिन्याच्या गोंडस चिमुकलीला सोडून मातेने पलायन केले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मंगळवारपेठ भागात खंडोबा मंदिराजवळ अज्ञात मातेने साधारणत: चार ते पाच महिन्याच्या मुलीला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून निघून गेली. सदरील प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर ज्ञानोबा देविदास टिंगरे यांनी तुळजापूर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस आता सदरील मातेचा तपास घेत आहेत. दरम्यान, पुढील सांभाळासाठी सदरील चिमुकलीला चाईल्ड लाईन उस्मानाबाद यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
चिमुकलीला मंदिराजवळ सोडून मातेचे पलायन
By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST