१ फेब्रुवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान आरोग्य केंद्रातील ४३ पैकी जवळपास ३१ गावात कोरोना पोहोचला.
२२ सप्टेंबर रोजी पर्यंत १२७२ कोरोना रुग्णांची नोंद भेंडाळा आरोग्य केंद्रात झाली. त्यातील १२३७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, सध्या १३ रुग्ण उपचार घेत आहेत. या काळात उपचारादरम्यान २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
केंद्रातील भेंडाळा आणि कायगाव कोरोना कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने काटेकोर नियोजन करून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणला.
चौकट
आरोग्य केंद्रांतर्गत येणारी गावे आणि रुग्णसंख्या
कायगाव-१००, वाहेगाव -१४८, भेंडाळा -१२५, गणेशवाडी -२५, पखोरा-१९, लखमापूर -३८,
नेवरगाव -१२५, भिवधानोरा -३९, मांजरी-८२, जामगाव - ९३, कानडगाव -१०, अंमळनेर -४८, वरखेड - ११८, अगरवाडगाव -१३, पिंपळवाडी - ४, बगडी -३७, बाबरगाव -३५, नवाबपूरवाडी -२६, ममदापूर- १३, बोलेगाव- २०, हनुमंतगाव- ७, सोलेगाव -१२, माहुली- ११, ढोरेगाव- १०, मुद्देशवाडगाव- १४, बोरजाई - ३, रघुनाथनगर- १, गळनिंब - ५५, सय्यदपूर -१, सिद्धपूर - ५, आणि सावखेडा मांजरी- ८.