शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीत उद्योजकांचा सुरक्षेवर अधिक भर; प्रत्येकाची केली जात आहे कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:51 IST

तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे. प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांकडून कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगाराची कसून तपासणी केली जात आहे. 

वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची ९ आॅगस्ट रोजी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण उद्योगनगरी हादरून गेली.  तोडफोडीमुळे अनेक उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या धक्क्यातून सावरत उद्योजक सुरक्षेवर अधिक भर देताना दिसून येत आहेत. औद्योगिक वसाहतीत लहान-मोठ्या जवळपास ३ हजारांवर कंपन्या असून, लाखो कामगार काम करतात; मात्र बऱ्याच कामगारांची पूर्ण माहिती ना कंपनी व्यवस्थापनाकडे असते ना ठेकेदाराकडे. त्यामुळे त्या कामगारापर्यंत पोहोचणे बऱ्याचदा कंपनी व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणेला अवघड जाते. 

प्रशासकीय यंत्रणेवर अधिक अवलंबून न राहता स्वत:च उद्योजकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक कारखान्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह संरक्षक भिंतीची उंची वाढविली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ केली जात आहे. या बाह्य सुरक्षा उपायांबरोबरच कारखान्याच्या आतील सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगारांचीही सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे, तसेच कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारालाही संबंधित कामगारांची सर्व इत्थंभूत माहिती संकलित करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून तंबी देण्यात आली आहे.  

सुरक्षारक्षकामार्फत तपासणी कारखान्यात यंत्रसामग्रीबरोबरच उत्पादित केलेला पक्का माल असतो. हा माल थोडा जरी डॅमेज झाला तरी कंपनीचे नुकसान होते. शिवाय कंपनीत ज्वलनशील पदार्थही असतात. याची फार काळजी घ्यावी लागते. तोडफोडीच्या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कारखान्यातील वस्तूची चोरी होऊ नये, तसेच धोकादायक वस्तू, पदार्थ कारखान्यात जाऊ नये म्हणून कामगारांची सुरक्षा रक्षकामार्फत तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद