शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या बाजारपेठेत इराणच्या खजुराला जास्त मागणी; ७० पेक्षा अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:24 IST

 भारतात येणाऱ्या एकूण खजुरामध्ये ७० टक्के खजूर इराणचा असतो.

ठळक मुद्दे खजुराचे रंग,आकार व चवीनुसार अनेक नावे आहेत. त्या नावामागेही कहाणी आहेआशिया देशातील लोक कलमी खजूर पसंत करतात

औरंगाबाद :  जगात ५०० पेक्षा अधिक प्रकारचे खजूर मिळतात. १५० प्रकारचे खजूर भारतात विक्रीला येतात. त्यातील ७० नमुन्यांचे खजूर औरंगाबादेत विक्रीला आणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इराणच्या खजुराला शहरात सर्वाधिक पसंती मिळत आहे. प्रत्येक खजुराची चव वेगवेगळी असून, १०० रुपयांपासून ते ३ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत ते विकले जात आहे. यातील ३०० ते ६०० रुपये किलोदरम्यानच्या खजुराला अधिक मागणी आहे. 

खजूरचा प्रकार एक असला तरी त्यातही लहान-मोठ्या आकारातील, लाल, पिवळ्या, काळ्या रंगातील, काही चिकट, तर काही कोरडी, काहींमध्ये बिया असलेले, तर बिगर बियांचे खजूर आहेत. काही खाण्यास एकदम रसगुल्ल्यासारखे, तर काही थोडे कडक. काही खजुरांचा रंग तर चॉकलेटसारखाच. तुमच्या समोर खजूर ठेवले की चॉकलेट हेच सुरुवातीला कळत नाही. खजुराची ही चवदार दुनिया अनुभवायची असेल तर त्यास खास खजूर विक्रेत्यांच्या दुकानातच जावे लागेल. काही विक्रेत्यांनी खजूर एसीमध्ये किंवा फ्रिजरमध्ये ठेवले आहेत. यामुळे हे खजूर तोंडात ठेवले की, एकदम थंडगार लागतात. रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दररोज सायंकाळी इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन पाणी पिऊन रोजा सोडण्याची प्रथा आहे.

खजुराचे आयातक अब्दील रखीब मजहर यांनी सांगितले की,  सौदी अरेबिया, इराण, दुबई, ओमान, इराक, जॉर्डन, बेल्जियम, ट्यूनिशिया आदी देशांतून खजूर आयात केले जातात. आशिया देशातील लोक कलमी खजूर पसंत करतात, तसेच अज्वा खजुराची सर्वाधिक विक्री होते. औषधी म्हणूनही या खजुराचा वापर केला जातो. सौदी अरेबियातील  अंबर (मोठ्या आकारातील) खजूर लोकांना जास्त आवडते. १२०० ते ३ हजार रुपयांदरम्यान प्रतिकिलो अंबर खजूर विकले जाते.  भारतात येणाऱ्या एकूण खजुरामध्ये ७० टक्के खजूर इराणचा असतो.  इराक येथील झेदी खजूर थोडा स्वस्त असतो. खजुराचे रंग,आकार व चवीनुसार अनेक नावे आहेत. त्या नावामागेही कहाणी आहे, असेही त्यांनी नमूद केले. शहारात किरकोळ विक्रीत १०० रुपयांपासून खजूर विक्री होत असले तरी त्यातही ३०० ते ६०० रुपये किलोदरम्यानचे खजूर जास्त प्रमाणात विक्री होतात. 

रसगुल्ल्यासारखा खजूर बाजारात खजुरात अनेक प्रकार आहेत; पण एक ‘सुक्करी’ खजूर तोंडात ठेवल्यावर आपण रसगुल्ला खाल्ल्यासारखा भास होतो. चॉकलेटी रंगातील हा खजूर नरम आहे. ज्यांना दात नाही तेही हा खजूर आरामात खाऊ शकतात. उन्हाळ्यात या खजुराला अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेते शेख मुख्तार शेख नजीर यांनी दिली.

भेट देण्यासाठीही खजुराचा वापर रमजान महिन्यात शहरात खजुराच्या विक्रीत कोट्यवधींची उलाढाल होत असते. आता तर भेट देण्यासाठीही मिठाईऐवजी खजुराचा वापर केला जात आहे. नुकतेच सीबीएसईचे दहावी व बारावीचे निकाल लागले. त्यात विद्यार्थी पास झाले. त्यांनीही पेढे वाटण्याऐवजी खजूर वाटले, तसेच अनेक जण भेट देण्यासाठी पावशेर, अर्धा किलोचे खजुराचे बॉक्स तयार करून नातेवाईक, मित्रपरिवाराला देताना दिसून येत आहेत.

टॅग्स :RamadanरमजानAurangabadऔरंगाबादMarketबाजार