नांदेड : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांसह पादचार्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे. तरोडा नाका, छत्रपती चौक ते काबरानगर, श्रीनगर, स्नेहनगर पोलिस वसाहतीसमोरील रस्ता, व्हीआयपी रस्ता, वजिराबाद चौक, बोरबन फॅक्ट्री रस्ता आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. दहा ते पंधरा जनावरे एकत्रित येवून रस्त्यावर बसत आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रविवारी दुपारी काबरानगर रस्त्यावर जवळपास ५२, श्रीनगर येथे १५ आणि एसपी ऑफिस चौकातून कौठय़ाकडे जाणार्या रस्त्यावर ६२ मोकाट जनावरे आढळून आली. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत.
मोकाट जनावरांनी नांदेडकर हैराण
By admin | Updated: August 31, 2015 13:21 IST