शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

 सीताफळाच्या मोहाने त्याचा दहा दिवस विहिरीत मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:11 IST

माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले.

दौलताबाद : माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले.राजू बगदार आणि अहेमद बगदार यांचे माळीवाडा-आसेगाव शिवारात शेत असून त्यात एक विहीर आहे. त्याच्या आजूबाजूला झाडेझुडपे असल्याने विहीर दिसत नाही. तेथे धरमसिंग विके (१६, रा. गोंडवस्ती माळीवाडा) हा तरुण तेथील झाडाचे बोरं तोडायला गेला असता त्याला सीताफळाचे झाड दिसले. बोरं तोडल्यानंतर त्याला सीताफळ तोडण्याचा मोह झाला. या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो या कोरड्या ३० फूट विहिरीत पडला. हा परिसर निर्मनुष्य असल्याने इकडे कुणीही फिरकत नाही. त्यामुळे धरमसिंगने आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. धरमसिंगची आई, सहा बहिणी, चार भाऊ त्याला शोधून थकले. हे सर्व जण मिळेल ते काम करून उपजीविका भागवितात....अन् तो शेतकरी देवदूत ठरलाशनिवारी मन्सूर पठाण हे आपल्या शेतात चक्कर मारायला या भागातून जात असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीजवळ जाऊन बघितले असता त्यांना सदर तरुण दिसला. त्यांनी जवळच असलेला त्यांचा भाऊ बाबा पठाण यांना बोलावले व दोन्ही भावांनी धरमसिंगला दोराच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढले. तो थरथर कापत होता. विचारपूस केल्यावर त्याने नाव व पत्ता सांगितला. दोन्ही भावांनी त्याला त्याच्या घरी सुखरूप आणून सोडले. सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज सिरसाट यांना मिळाली. त्यांनी त्याला माळीवाडा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. प्रथमोपचार करून त्याला सुटी देण्यात आली. त्याचा हात मोडला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीSocialसामाजिक