शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

मोदी लाटेवर दानवे स्वार!

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत अवघ्या ८४८२ मतांनी विजय पटकाविलेल्या खा. रावसाहेब दानवेयांनी मोदींच्या त्सुनामी लाटेवर स्वार होत विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला.

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत अवघ्या ८ हजार ४८२ मतांनी विजय पटकाविलेल्या खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी तुल्यबळ लढतीच्या हवेत मोदींच्या त्सुनामी लाटेवर स्वार होत विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. महायुतीचे खा. दानवे विरूद्ध काँग्रेस आघाडीचे विलास औताडे यांच्यातील लढत तुल्यबळ होईल, असे चित्र निर्माण झाले होते. विशेषत: तीन वेळा हॅटट्रीक केलेल्या दानवेंविरोधात आघाडीने संपूर्ण रणधुमाळीत अक्षरश: टीकेचे झोड उठविले. त्याव्दारे दानवेंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर कडवट टीका करतेवेळी आघाडीने वैयक्तिक पातळीही गाठली. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन असे एकूण सहा आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या सत्तास्थानांच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या सक्षम असणार्‍या आघाडीने या निवडणुकीच्या माध्यमातून पंधरा वर्षापासूनचा राजकीय वनवास संपविण्याचा संकल्प सोडला होता. औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन तर केलेच; आघाडी अंतर्गत ऐक्याचे दर्शनसुद्धा घडविले. विशेषत: तेथूनच दानवेंविरोधात पद्धतशीरपणे राळ उडविण्यास सुरूवात केली. वनवास संपवू असा संकल्प करणार्‍या या लोकप्रतिनिधींनी ‘आमच्यात मताधिक्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे,’ अशाही वल्गना केल्या. त्यामुळे आघाडीअंतर्गत पदाधिकार्‍यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘कोरी पाटी’ असणारे औताडे गटबाजीच्या राजकारणात अडकणार नाहीत, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत निर्माण झाला. शक्तीप्रदर्शनापासून दानवेंविरोधातील वातावरण आघाडीने पेटविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे स्टार प्रचारक खा. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेतून आघाडीने पुन्हा शक्तिप्रदर्शन घडवून महायुतीत अस्वस्थता निर्माण केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून मोदींची सभा हवीच, असे महायुतीस वाटले खरे, परंतु मोदींची सभा मिळालीच नाही. मात्र, आपल्या विरोधातील नकारात्मक सूर मतपेटीतून उमटू नये म्हणून दानवेंनी जिवाचे रान केले. मोदी लाटेवर स्वार होण्याचा चंग बांधला. ‘होमपीच’ भोकरदनसह बदनापूर व पैठणवर लक्ष केंद्रित केले. फुलंब्री व सिल्लोडला आघाडीत सुरूंग लावला. अखेर शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाटेने हतबल झालेल्या आघाडीने दानवेंसमोर सपशेल शरणागती पत्करली. जिंकल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट नियोजनबद्ध अशी प्रचारयंत्रणा रणधुमाळीतील फोडा-फोडीचे राजकारण २२ निवडणुकांचा भक्कम अनुभव हरल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट आघाडीची ढिसाळ प्रचारयंत्रणा सत्तारूढ आमदारांचा फाजील आत्मविश्वास काँग्रेसविरोधी नकारात्मक सूराचा फटका या कारणांमुळे मिळाला विजय गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेवर खा. रावसाहेब दानवे पाटील हे सहजपणे स्वार झाले. तीन वेळा हॅटट्रिक केलेल्या दानवेंविरोधात विरोधकांनी आळवलेला नकाराचा सूर लाटेत पार विरघळला. राजकीय आयुष्यात २२ वेळा निवडणुका लढविलेल्या व २१ निवडणुकांमधून यश पटकाविलेल्या दानवे यांनी या निवडणुकीत अनुभवाच्या भक्कम शिदोरीवरच विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. २२ व्या वेळीही यश मिळविले. या मतदारसंघात राजकीयदृष्ट्या आघाडीचे प्रचंड प्राबल्य होते. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसारखी सत्तास्थाने पाठीशी असतानासुद्धा आघाडीअंतर्गत लोकप्रतिनिधींसह पुढार्‍यांमधील ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ दानवेंच्या पथ्यावर पडला.