जालना : मोठा गाजावाजा करुन दक्षिण मध्य रेल्वेने जालना रेल्वेस्थानक आदर्श बनविण्याचे ठरविले खरे, मात्र हे काम गत तीन ते चार वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. या मॉडर्न रेल्वेस्थानकाचे काम अपुर्या निधीमुळे कासव गतीने सुरु असल्याने प्रवशांतून तसेच शहरवासियांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ७५ लाखांचा निधी उपलंब्ध झाला असून आतापर्यंत ६५ लाख रूपये खर्च झाला आहे आणि राहिलेल्या कामासाठी १० लाख खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात रेल्वे गाड्या स्वच्छ करण्यासाठी अॅप्रॉन होणार आहे. प्रवाशांसाठी जेवणाची उत्तम सोय असलेला फुड फ्लाझा होणार आहे. आणि स्टेशनसमोर गर्दी होवू नये यासाठी आॅटो, कार साठील स्वतत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.छोटे गार्डन, ३० मीटरपर्यंत शेड टाकण्याचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली. उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. जालना रेल्वे स्थानकाअंर्तगत बदनापूर, सारवाडी, कोडी, रांजणी, पारडगाव, सातोना, आणि सेलू हे स्टेशन येतात सध्या सेलू येथील रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. दोन महिन्यात नवीन इमारतीचे काम पूर्ण होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी माहिती दिली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच फलाटवर छत टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. इमारतीचे काम, विद्युतीकरणाचे काम, रंगरंगोटी काम, पिण्याच्या पाण्याची सोय अद्यापही झालेली नाही. पालिकेला प्रस्ताव पाठविल्याने त्यावर लवकरच निविदा काढणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता प्रवाशांना पाणीटंचाई भासू नये म्हणून नवीन जलवाहिनी घेण्यासाठी नगर पालिकेकडे अर्ज करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकातील मूलभूत कामे तसेच वाहनांची पार्किंग करण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. जालना व्यावसायिक शहर तसेच औद्योगिक शहर असल्याने येथून देशभरातून प्रवाशांची ये- जा असते. दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दक्षिण मध्य रेल्वेने मोठ्या शहरांच्या धर्तीवर येथील आदर्श रेल्वेस्थानकाचे काम गतीने करण्याची अपेक्षा प्रवाशांतून होत आहे. मोठी गर्दी होताच अनेकदा नियोजन कोलमडत असल्याचे चित्र आहे. केवळ ७५ लाखांचा निधी प्राप्त दक्षिण-मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत चर्चा केली असता, स्थानकाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानक निश्चितच आदर्श असे बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मॉडर्न रेल्वेस्थानक’ रखडलेलेच
By admin | Updated: May 7, 2014 23:58 IST