शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा; कर्जाच्या फायलींना १५९ बँकांचा ठेंगा

By बापू सोळुंके | Updated: July 28, 2023 14:36 IST

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांना पाठविण्यात आलेल्या कर्ज फायलींबाबत बँकांचा नकारात्मक दृष्टिकोन

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्रांनी (डीआयसी) पाठविलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जांच्या फायलींना १५९ बँकांनी केराची टोपली दाखविली आहे. एवढेच नव्हे तर, जिल्ह्यातील ६६ बँकांनी प्रत्येकी एकच कर्ज फाइल मंजूर केल्याने बँकांची सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याबाबतची उदासीनता दिसून येत आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करण्यात येते. यात ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केले होते. अर्ज छाननीत योग्य असलेल्या सुमारे ३ हजार ३५२ कर्जाच्या फाइली जिल्हा उद्योग केंद्राने ३०६ बँकांकडे कर्ज वाटपासाठी पाठविल्या होत्या. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगारास १० लाखांपर्यंत विनातारण कर्ज देणे आवश्यक असते. यापैकी केवळ ५०४ सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्ज फायली मंजूर केल्या आहेत. उर्वरित १,७२९ बेरोजगारांना थेट कर्ज नाकारले, तर १,१९० कर्ज फायलींवर कोणताही निर्णय घेतला नाही. जिल्ह्यातील ३०६ पैकी १५९ बँकांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकाही सुशिक्षित बेरोजगारास कर्ज मंजूर केले नाही. तर ६६ बँकांनी प्रत्येकी केवळ एकाच बेरोजगाराला कर्ज दिले. शासनाच्या चांगल्या योजनेला खीळ बसविण्याचे काम या बँकांनी केले.

खादी ग्रामोद्योगचीही योजनाखादी ग्रामोद्योग मंडळाकडूनही सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. नियमित परतफेड करणाऱ्यांना अनुदान प्राप्त होते. या योजनेंतर्गत कर्ज मिळावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील ९५३ जणांनी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे कर्ज प्रकरण दाखल केले. मंडळाकडून आलेल्या कर्ज फायलींपैकी केवळ ९० कर्जप्रकरणे बँकांनी मंजूर केली.

बँकांचा नकारात्मक दृष्टिकोन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांना पाठविण्यात आलेल्या कर्ज फायलींबाबत बँकांचा नकारात्मकच दृष्टिकोन असल्याचे निदर्शनास येते. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील १५९ बँकांनी एकही कर्ज फाइल मंजूर केली नव्हती. बँकांनी जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- अजिंक्य आजगेकर, जिल्हा उद्योग केंद्र.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद