शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमची हेराफेरी करून फसविले

By admin | Updated: August 13, 2014 01:07 IST

लातूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून एकाला २९ हजारांना चुना लावल्याची घटना सोमवारी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये घडली.

लातूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून एकाला २९ हजारांना चुना लावल्याची घटना सोमवारी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये घडली. याबाबत एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उदगीर शहरातील तिरुपती सोसायटीतील रंगराव ग्यानोबा मोरे हे मुलाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उदगीर शहरातील शिवाजी चौकातील एसबीआय एटीएममध्ये सोमवारी ९.४५ वाजण्याच्या सुमारास गेले होते. एटीएम मशीनवर ३ ते ४ वेळा प्रयत्न करूनही पैसे ट्रान्सफर होऊ शकले नाहीत. यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करून देतो म्हणून रंगराव मोरे यांच्या जववळील एटीएम कार्ड घेतले व त्यांना तीन ते चार वेळा एटीएम कोड दाबण्यास सांगितले. पण पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. दरम्यान, ‘त्या’ व्यक्तीने मोरे यांचे एटीएम कार्ड जवळच ठेवून घेतले व त्याच्या जवळील एटीएम कार्ड देऊन निघून गेला. पण काही वेळातच मोरे यांच्या ६०२०५३९२२६६९ या बँक खाते क्रमांकातून २९ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. एटीएम कार्डची अदलाबदल करून ‘त्या’ अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात आले, असे उदगीर ग्रामीण पोलिसात रंगराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४०६, ४२० भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)