शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीसाठी मोबाइल स्नॅप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:19 IST

अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मोबाइल स्नॅपचा वापर करून हायटेक कॉपी पुरविणाºया रॅकेटचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका तरुणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांमध्ये एक विद्यार्थी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मोबाइल स्नॅपचा वापर करून हायटेक कॉपी पुरविणाºया रॅकेटचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका तरुणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांमध्ये एक विद्यार्थी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे.बीड रस्त्यावरील भालगाव येथील शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी परीक्षा देणारा रवींद्र पवार (रा. तोलानाईक तांडा, औरंगाबाद तालुका) आणि हायटेक कॉप्या पुरविणारा अक्षय त्र्यंबक सरकटे (२२,रा. देवखेड ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) यांना पोलिसांनी अटक केली असून दिव्या सतीश गाजरे (२०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५) या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या भीतीने आशिष जोगदंड नावाचा तरुण पसार झाला.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले की, ९ नोव्हेंबरपासून या कॉलेजमध्ये परीक्षा सुरू आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कॉलेजच्या परिसरात कॉपी सुरू असल्याची माहिती मिळाली. परीक्षा केंद्राबाहेर एका कारमध्ये काहीजण पुस्तकाच्या चिठ्ठ्या फाडताना व त्या मोबाइलद्वारे परीक्षा कक्षातील विद्यार्थ्यांना पाठवीत असल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या पथकाला दिसले. काही तरी गोंधळ आहे, असे समजून पथकातील पोहेकॉ टिमकीकर यांनी याबाबत वरिष्ठाला माहिती दिली. त्यावरून ताईतवाले, फौजदार सुधाकर चव्हाण, कटकुरी, थोटे, सुनील गोरे, दीपक इंगळे, संतोष टिमकीकर, नामदेव इजलकुंठे, महिला पोलीस छाया राठोड यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तिथे कारमध्ये तिघेजण बसल्याचे दिसले. पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या अक्षय सरकटे आणि दिव्या गाजरे यांना ताब्यात घेतले, तर जोगदंड पसार झाला. पकडलेल्या दोघांकडे पुस्तकातून काढलेल्या चिठ्ठ्या आढळल्या. यावेळी पोलिसांनी अक्षय सरकटे याच्या हातातील मोबाइल घेऊन पाहणी केली. त्याच्या मोबाइलमध्ये कॉलेजमध्ये चालू असलेल्या ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या पेपरचे काही फोटो (स्नॅप) काढलेले दिसले. परीक्षा केंद्रात बसलेल्या रवींद्रने त्याच्या पेपरचे काही स्नॅप व्हॉटस् अ‍ॅपद्वारे अक्षयकडे पाठविले होते. या स्नॅपनुसार प्रश्नांची उत्तरे कारमध्ये बसलेले तिघे पाठवत असल्याचे स्पष्ट झाले.मुलीच्या हातात फाडलेल्या पुस्तकाच्या चिठ्ठ्या होत्या. त्या चिठ्ठ्या व स्नॅप तपासले असता त्या कॉपी असल्याचे निदर्शनात आले.चिकलठाणा पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय सरकटे व परीक्षार्थी रवींद्र पवार यास अटक केली असून, अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहे.