शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा मनपावर विराट मोर्चा

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला.

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णा भाऊ साठे चौकातून सकाळी ११ वाजता निघालेला मोर्चा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मनपावर धडकला.लातूर शहरात कचऱ्याचे जागोजागी ढिग साचले आहेत. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. एलबीटीमुळे व्यापारी हैराण आहेत. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला.यशवंत शाळेसमोरील शासकीय गोडावून जवळ सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे़, रिंगरोडवरुन डीपी प्लॅनप्रमाणे ज्ञानेश्वर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील वीस वर्षांपासून असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, शहरातील अनेक रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, लिकेज झालेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी, मनपाचे दवाखाने व शाळांची दुरवस्था थांबवावी़, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण तात्काळ करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनपा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना देण्यात आले. निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, साईनाथ दुर्गे, राजकुमार होळीकर, सुनिल मलवाड, गणेश गवारे, बालाजी जाधव, राज क्षीरसागर, पप्पू धोत्रे, शाम जाधव, फुलचंद कावळे, गीता गौड, विनोद मालू, सुनिल सौदागर, हरिओम भगत, महादेव कलमुकले, इक्रांत सय्यद, युवराज कांबळे, योगिता जानतीकर, प्रसाद स्वामी, मनोज अभंगे, अमर गिरी, महेश खोबरे, अ‍ॅड. सचिन चामले, गजानन कातळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)कचरा, पाण्याचा प्रश्न गंभीर : बाळा नांदगावकरलातूर शहरात कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लातूर शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून, सत्ताधारी नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा विराट मोर्चा काढला असल्याचे आमदार बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. नागरी समस्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.