शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:28 IST

अंबादास दानवेंच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष!

- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे यांचा औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकी व विधान परिषद विरोधी पक्षनेता पदाचा कार्यकाळ शुक्रवारी (दि.२९ ऑगस्ट) संपुष्टात येत आहे. दानवे भविष्यात ठाकरे गटातूनच विरोधकाची भूमिका वटविणार की सत्तेकडे जाणार? अशी चर्चा आता जोर धरते आहे.

दानवे २२ ऑगस्ट २०१९ रोजी आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनीच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. विशेष म्हणजे २०१९ साली भाजपाचे या मतदारसंघात सर्वाधिक १८९ नगरसेवक मतदार असतानाही त्यांना युतीमुळे उमेदवारी मिळाली. शिवसेनेचे तेव्हा १४१ नगरसेवक मतदार या मतदारसंघात होते. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दानवे यांनी ५२४ मते घेत आघाडीचे उमेदवार भवानीदास उर्फ बाबूराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला होता. २९ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली होती. एमआयएमची सुमारे २५ ते अपक्षांची ९ मते दानवे यांना मिळाल्यामुळे राजकारण तापले होते. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आखलेल्या रणनीतीमुळे दानवे विजयी झाल्याची तेव्हा चर्चा होती.

आता पुढे काय...या सहा वर्षांत माजी खा. चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यात सख्य राहिले नाही. दानवे यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र ठाकरे गटाने खैरेंना उमेदवारी दिली. दानवे शिंदेगट किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. दोन्ही पक्षांतून त्यांना विरोध असल्याचेही बोलले गेले. पावसाळी अधिवेशनात त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मूळचे भाजपचे असल्याचा उल्लेख केल्याने पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या. त्यामुळे २०२९ पर्यंत दानवे ठाकरे गटातूनच विरोधकाची भूमिका वटविणार की सत्तेकडे जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

दानवे काय म्हणाले,सहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघासह राज्यभर काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे या कार्यकाळाबाबत समाधानी आहे. ठाकरे गटाचे नेते म्हणून संघटनेचे काम सुरू राहील.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेchhatrapati shasan movieछत्रपती शासनShiv Senaशिवसेना