शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्री सत्तारांच्या कृषीमहोत्सवाला आमदार शिरसाटांची दांडी

By बापू सोळुंके | Updated: January 1, 2023 22:30 IST

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता.

औरंगाबाद:  

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी  दांडी मारल्याने शिरसाट आणि कृषी मंत्री सत्तार यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. 

शेतकऱ्यांबद्दल ज्यांना आस्था आहे ते सर्व आमदार कार्यक्रमाला उपस्थित होते असे  विधान सत्तार यांनी केले.यामुळे मंत्रीपद न मिळालेला स्वपक्षातील नेता आपल्याविरोधात कट करीत असल्याचे सत्तार यांच्या विधानाचा रोख आमदार सिरसाट यांच्या दिशेने होता,असे बोलले जात आहे.  शिरसाट यांच्यासोबत आपले अथवा त्यांचे आपल्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारवही त्यांनी केली. 

शिवसेनेतील बंडाच्या वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. यामध्ये अग्रभागी होते ते औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. आ. संजय शिरसाट यांना मंत्री केले जाईल,  याबाबत  शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होती.  मात्र ऐनवेळी  यादीतून त्यांचे नाव कापून सिल्लोडचे  आमदार  अब्दुल सत्तार  यांना मंत्री करण्यात  आले.  सत्तार यांना मंत्रीपद  मिळू नये,  यासाठी नेमके त्याच वेळी  त्यांच्या टीईटी घोटाळ्यातील यादीत त्यांच्या  मुलांची  नावे असल्याचे प्रकरण समोर आले होते. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गायरान जमीन वाटप कथित घोटाळा, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी पावती पुस्तक छापल्याचे प्रकरण समोर आणून सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. यापार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना  मंत्रीपद मिळाले नाही,असा स्वपक्षातील नेता माझ्याविरोधात कट करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर शिंदेगटातील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चेला सुरवात झाली. यादरम्यान  सत्तार यांनी आयोजित कृषी महोत्सावचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती  सिल्लोड येथे झाले. या उदघाटनासाठी आमदार संजय शिरसाट यांनी दांडी मारली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमासाठी शिंदे गटातील आ. शिरसाट वगळता अन्य सर्व आमदार हजर होते. विषयी बोलताना सत्तार यांनी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रेम होते ते सर्व आमदार आले असे खोचक विधान केले. यावरून सत्तार यांचा कालचा बोलण्याचा रोख  शिरससाट यांच्या दिशेने होता, असे बोलले जात आहे.  शिरसाट यांना दुसरे महत्वाचे काम असेल यामुळे ते आले नसावे,असे नमूद करीत  आपले शिरसाट यांचे आपल्याबद्दल आणि माझे त्यांच्या बद्दल कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारव कृषीमंत्र्यांनी केली.