शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटीच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र!

By admin | Updated: August 28, 2014 00:24 IST

औरंगाबाद : एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बुधवारी लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय सहसंचालक आणि संपादकीय प्रमुख ऋषी दर्डा यांनी मीडियातील कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र दिला.

औरंगाबाद : एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना बुधवारी लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय सहसंचालक आणि संपादकीय प्रमुख ऋषी दर्डा यांनी मीडियातील कॉर्पोरेट व्यवस्थापनाचा यशमंत्र दिला. ‘कॉर्पोरेट मॅनेजमेंट’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी, प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी ऋषी दर्डा यांचे स्वागत केले. संचालक डॉ. जी.जी. सहा यांनी प्रस्तावना केली. नेतृत्व, प्रामाणिकपणा, कल्पकता, जागृती आणि व्यवसायाशी असलेले दीर्घकालीन नाते या पाच खांबांवरच कॉर्पोरेट व्यवस्थापनाच्या यशाचा डोलारा उभा असल्याचे ऋषी दर्डा यांनी स्पष्ट केले. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना मीडियातील करिअरच्या काय संधी आहेत? फ्रेशरर्सना प्रशिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत, हे सांगतानाच त्यांनी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असायला हवे, यावर विशेष भर दिला. ‘लोकमत’च्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मीडियातील व्यवस्थापनाविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरे दिली. विद्यापीठाच्या परीक्षेत पाचवा क्रमांक मिळविणारी एचआरची विद्यार्थिनी अश्विनी गरड हिचा ऋषी दर्डा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. लीना कोट्स, प्रा. दिव्या शर्मा यांची उपस्थिती होती.