शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे मिशन डिसेंबरपर्यंत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:09 IST

औरंगाबाद मनपासह राज्यातील १२ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत एप्रिल, मे, जून या महिन्यापर्यंत होती.

ठळक मुद्देकोरोना काळावर भवितव्य अवलंबून

औरंगाबाद : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला डिसेंबर २०२० पर्यंत सध्या प्रतीक्षा करावी लागेल. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांत कोरोना व्हायरसचा प्रसार, नियंत्रण यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.

औरंगाबाद मनपासह राज्यातील १२ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत एप्रिल, मे, जून या महिन्यापर्यंत होती. या  १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २८ एप्रिलपासून २८ जूनपर्यंत निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झाले नाही, असे आयोगाने नगरविकास खात्याला एप्रिल महिन्यात कळविले होते.कोरोना अजून नियंत्रणात आलेला नाही. निवडणुका म्हटल्यावर गर्दी, प्रचारसभा, दारोदारी प्रचार, कॉर्नर बैठका होतात. कोरोनाची साथ नियंत्रणात आली नाही तर वरील सर्व कार्यक्रमांवर बंदीच असेल. त्यामुळे पुढील तीन महिने कोरोनाचा प्रभाव कसा राहतो, यावर निवडणुकांची रूपरेषा ठरेल, असे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत होती अशी औरंगाबाद मनपा २८ एप्रिल, नवी मुंबई मनपा ७ मे, वसई-विरार २८ जून, कुळगाव-बदलापूर नगर परिषद १९ मे, अंबरनाथ नगर परिषद १९ मे, राजगुरूनगर (पुणे) १५ मे, भडगाव (जळगाव) २९ एप्रिल, वरणगाव ५ जून, केज नगरपंचायत १ मे, भोकर नगर परिषद ९ मे, मोवाड नगर परिषद  १९ मे, तर वाडी नगर परिषदेची १९ मे २०२० रोजी मुदत संपलेली आहे. या सर्व ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे. 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक लांबणीवरमराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम डिसेंबरनंतरच जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पदवीधर निवडणुकीसाठी सुमारे ३ लाख ५२ हजारांवर मतदार नोंदणी गेली आहे. गेल्या निवडणुकीसाठी २० जून २०१४ रोजी मतदान झाले होते. २४ जूनच्या आसपास मतमोजणी झाली होती, तर २२ मे २०१४ रोजी अधिसूचना निघाली होती.  विद्यमान लोकप्रतिनिधीची मुदत संपली असून आयोगाकडून  कुठल्याही सूचना नाहीत.  

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या