औरंगाबाद : दवाखान्यात उपचारासाठी गेलेली महिला साडेतीन वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता झाली. ही घटना एमजीएम रुग्णालय परिसरात घडली.याविषयी सिडको पोलीस ठाण्याचे हवालदार पठाण यांनी सांगितले की, गेवराई तालुक्यातील उमापूर येथील रहिवासी रब्बाना मजहर शेख (३०) ही महिला २९ सप्टेंबर रोजी आपल्या पती आणि साडेतीन वर्षीय मुलीसह एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी आली होती. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रब्बाना आणि मुलीला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभे करून मजहर शेख हे औषधी खरेदीसाठी दुकानात गेले. त्यानंतर ते औषधी घेऊन परत आले तेव्हा मायलेकी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी परिसरात आपल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. शेवटी त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. गायब झालेल्या महिलेचा पती उमापूर ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. त्यांनी एका वाहनचालक व्यक्तीवर याबाबत संशय व्यक्त केला असून, तो दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याने वेगवेगळ्या नावांची आठ सीमकार्ड खरेदी केलेली आहेत. तसेच तो वारंवार मोबाईल नंबर बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना अवघड ठरत आहे.
दवाखान्यात गेलेली महिला चिमुकलीसह बेपत्ता
By admin | Updated: October 8, 2014 01:06 IST